टवळाई शिवारात गांजाची शेती

टवळाई शिवारात गांजाची शेती
Published on
(पान १ ला मेनला जोड) फोटो : NSK26H28912 टवळाई : येथील शेतशिवारातून पोलिस पथकाने जप्त केलेली गांजाची झाडे. ------------------ टवळाई शिवारात गांजाची शेती उद्‌ध्वस्त एकावर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ६ : शेतात गांजाची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतातून आठ लाख २५ हजार रूपये किमतीचा १६ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. शहादा तालुक्यातील टवळाई गावातील शेत शिवारात एका इसमाने त्याच्या शेतात मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी याबाबत पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने शेताची पाहणी केली असता तेथे १६ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा आठ लाख २५ हजार ९०० रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळून आली. गांजाची झाडे पथकाने ताब्यात घेतली आहेत. गांजासदृश्‍य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आढळून आल्याने घुशा ठुमल्या ब्राम्हणे (रा. टवळाई, ता. शहादा, जि. नंदुरबार) यास ताब्यात घेवून धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलिस हवालदार जितेंद्र पाडवी, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, पोलिस अंमलदार राहुल बोराळे, शोएब शेख, भरत उगले यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com