सुभाष चौकात दहीहंडीचा थरार

सुभाष चौकात दहीहंडीचा थरार
Published on
मेन फिचर NSK26H28911 जळगाव : सुभाष चौकात दहीहंडी फोडताना मंडळाचे कार्यकर्ते. (छायाचित्र : संधिपाल वानखेडे) --- NSK26H28913 शहरातील सागर पार्कवरील एलके फाउंडेशनच्या दहीहंडीचा भव्य सोहळा. --- सुभाष चौकात दहीहंडीचा थरार सागर पार्कात ‘एलके’चा भव्य सोहळा; शिवतीर्थावर महिलांनी रचले थर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात शनिवारी (ता. ५) विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. शहरातील मानाची सुभाष चौकातील दहीहंडी हा उत्सवाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. गोविंदा पथकांनी उंचच उंच थर रचत हंडी फोडण्यासाठी चुरस केली. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सुभाष चौक परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. गोविंदा पथकांनी एकामागून एक थर रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. थर वाढत असताना उपस्थितांच्या उत्सुकतेतही वाढ होत होती. हंडी फुटताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सवांमध्ये सुभाष चौकातील आयोजनाने विशेष लक्ष वेधून घेतले. सागर पार्कात आठ थर सागर पार्क मैदानावर एलके फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे यांच्या आयोजनाखाली भव्य दहीहंडी उत्सव झाला. गोविंदा पथकांनी आठ थरांचा डाव रचत दहीहंडी फोडली. हंडी फुटताच मैदानावर एकच जल्लोष झाला. जयपूरहून आणलेला भव्य सेटअप, सुमारे ५०० फुटांची महाकाय स्क्रीन, आकर्षक रोषणाई आणि लेझर शोमुळे सागर पार्क परिसर उजळून निघाला. पेशवा ढोल पथकाच्या कसरती आणि ढोल-ताशांच्या गजराने उत्सवाची रंगत आणखी वाढवली. थर रचताना नागरिकांनी घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात गोविंदांचा उत्साह वाढविला. चौकट शिवतीर्थावर महिला गोविंदांचा जल्लोष शहरातील शिवतीर्थ मैदानावर महिलांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी उत्साहाने सहभागी होत थर रचण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक उत्सवात महिलांचा वाढता सहभाग हा यंदाच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले. महिला गोविंदांच्या उत्साहाला उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. मान्यवरांची उपस्थिती सागर पार्क येथील दहीहंडी सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, पीयूष कोल्हे, एलके फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे, सिंधू कोल्हे, विष्णू भंगाळे, संतोष पाटील, प्रवीण कोल्हे, अरविंद देशमुख, चेतन शिरसाळे, सागर सपके, रेश्मा ताई काळे, उज्वला बाविस्कर, सरिता माळी, केतकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरक्षेसाठी खबरदारी गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी आयोजकांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मैदानासाठी विमा कवचाचीही व्यवस्था करण्यात आली होती. विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com