मालेगाव टुडे पान-२-- वर्धापनदिन
------------------
पंकज दात्रे -NSK26H28916
मल्हार हिल कॅम्पसची इमारत -NSK26H28917
------------------
मल्हार हिल ः स्वप्नांना पंख देणारे शिक्षणतीर्थ
---------
लीड
मुलांना‘ योग्य दिशा, संस्कार आणि संधी मिळाली तर ते स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवू शकतात या विश्वासातून पिंगळवाडे येथील भालचंद्र सोनू कोठावदे यांनी उभी केलेली आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भाक्षी ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी चळवळ ठरली आहे.
- पंकज दात्रे, मुख्याध्यापक, मल्हार हिल कॅम्पस, भाक्षी
--------------
मल्हार हिल कॅम्पसचा २०१७ मध्ये अवघ्या १५३ विद्यार्थ्यांसह सुरू झालेला प्रवास आज ११८३ विद्यार्थ्यांवर पोचला आहे. ही वाढ केवळ संख्येची नाही; ती पालकांच्या विश्वासाची, शिक्षकांच्या समर्पणाची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सातत्यपूर्ण ध्यासाची साक्ष आहे. ‘आधुनिकतेची आस, शिक्षणाची कास’ हे विद्यालयाचे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य नसून प्रत्येक कृतीमागील प्रेरणाशक्ती आहे. येथे शिक्षणाचा उद्देश परीक्षेतील यशाबरोबरच सुसंस्कृत, संवेदनशील, स्वावलंबी आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडविणे हा आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात संस्कार वर्गाने होते. श्लोक, प्रार्थना, बोधकथा, प्रेरणादायी प्रसंग, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची ओळख यांद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात चारित्र्य, शिस्त आणि कर्तव्यभावनेची बीजे पेरली जातात. ज्ञानाला संस्कारांची जोड मिळाल्यासच शिक्षण अर्थपूर्ण ठरते, हा विद्यालयाचा दृढ विश्वास आहे.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचा सहभाग अनिवार्य मानून विद्यालयाने ‘आईची दैनंदिनी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या दिनक्रमाची नोंद करून ती शिक्षकांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे शाळा आणि घर यांच्यात सातत्यपूर्ण संवाद निर्माण होतो. या उपक्रमात मनापासून सहभागी होणाऱ्या मातांचा दरवर्षी ८ मार्चला ‘आदर्श माता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. संस्कार, स्वयंशिस्त, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा समतोल साधणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान केला जातो. सकाळच्या सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबरोबरच अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेतले जातात. ‘वर्षाअखेरीस एकही विद्यार्थी अक्षरशत्रू राहणार नाही’ हा संकल्प शिक्षकांच्या निष्ठेने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरविला आहे. आजपर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत, तर ८ विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे. मंथन, प्रज्ञाशोध आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यालयाचे विद्यार्थी गुणवंत यादीत सातत्याने स्थान मिळवत आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नियमित साप्ताहिक चाचणी परीक्षा घेतल्या जातात. याचाच परिणाम म्हणून दहावीचा निकाल सलग आठ वर्षे १०० टक्के लागला आहे. फुटबॉलचे तब्बल १८ संघ राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो आणि कुस्तीमध्येही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विज्ञान प्रदर्शनात सलग आठ वर्षे यश मिळवत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्तीची चमक दाखवून दिली आहे. शिक्षकांचे प्रभावी अध्यापन आणि पालकांनी ठेवलेला संयमी विश्वास या बळावर संस्था आज कार्यप्रवण आहे. (जाहिरात पुरस्कृत)
-----------------