शहर टुडे पान तीनसाठी तळापासून वर सात कॉलम घ्यावी
-----------------------------------------------
NSK26H28850
जळगाव : ए. टी. झांबरे विद्यालयात शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात सहभागी शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी.
-----
NSK26H28932
जळगाव : डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील कार्यक्रमात सहभागी शिक्षक-शिक्षिका.
-------
NSK26H28933
जळगाव : चांदसरकर विद्यामंदिरातील कार्यक्रमात सहभागी शिक्षक.
-----------
NSK26H28934
जळगाव : शानभाग विद्यालयातील कार्यक्रमात सहभागी शिक्षक.
----------
NSK26H28935
जळगाव : मातोश्री प्राथमिक विद्यालयातील कार्यक्रमात सहभागी.
-----------------------------
शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांकडून अध्यापन
--------------
शिक्षक दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम; शिक्षकांचेही अनेकांकडून सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांत शिक्षकदिन म्हणून शनिवारी (ता.५) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या कार्याचे महत्त्व व विद्यार्थ्यांना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते.
........
झांबरे विद्यालय
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.४) स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळेचा कारभार सांभाळत अध्यापन केले. विशेष म्हणजे काही पालकांनीही ‘एक दिवस शिक्षक’ म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव घेतला. त्यात सेजल उमेश चौधरी, वैष्णवी सुमित भगत, भावना योगेश बारी, नम्रता सुमित वायकोळे, शीतल कैलास चौधरी व रोहिणी नीलेश देशमुख यांनी एक दिवस शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अध्यापन केले. या उपक्रमाचे आयोजन पूनम कोल्हे, मनीषा जयकर, वेदप्रकाश गडदे आर्य, दहावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी केले.
.......
मातोश्री विद्यालय
प्रबोधन संस्था संचलित मातोश्री प्राथमिक विद्यालयात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी ॲड. कैलास सोनार व मुख्याध्यापक समाधान इंगळे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत विविध विषयांचे अध्यापन केले.
.......
बेंडाळे महिला महाविद्यालय
लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, कुलसचिव व ग्रंथपाल अशा विविध भूमिका साकारत महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले. विद्यार्थिनींनी वर्गात अध्यापनही केले. प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
........
चांदसरकर विद्यालय
गि. न. चांदसरकर पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले.
.......
शानभाग विद्यालय
ब. गो. शानभाग विद्यालयात शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारली. सकाळच्या सत्रात १३५ व दुपारच्या सत्रात ११० विद्यार्थ्यांनी अध्यापन केले. मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, संगीत, शारीरिक शिक्षण आदी विषयांचे अध्यापन विद्यार्थ्यांनी केले. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.