त्रृटी आढळलेल्या आश्रमशाळांना नोटीस

त्रृटी आढळलेल्या आश्रमशाळांना नोटीस
Published on
मुख्य अंक, पान ३ ------------ त्रुटी आढळलेल्या आश्रमशाळांना नोटिसा --- प्रकल्प अधिकाऱ्यांची तातडीची कारवाई; अपर आयुक्तांना पडताळणी अहवाल किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आदिवासी आश्रमशाळेतील असुविधांविरोधात जनक्षोभ उसळल्याने राज्य शासनाने तातडीने या शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांनी पडताळणी करून त्रुटी आढळलेल्या शाळांना नोटिसा बजावल्या असून, त्याचा गोपनीय अहवाल अपर आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. --------------- आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर या चार अपर आयुक्तालयांतर्गत ३० प्रकल्प कार्यालये आहेत. येथील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या खासगी अनुदानित व शासकीय आश्रमशाळांची तपासणी करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी दिले होते. त्यानुसार नाशिकच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे व कळवणच्या प्रकल्प अधिकारी डॉ. कश्‍मिरा संखे यांनी शाळांची तपासणी केली. नाशिक प्रकल्पांतर्गत पेठ, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, सिन्नर व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील शाळांची पाहणी केली. कळवणमधील सुरगाणा, कळवण, बागलाण, चांदवड व देवळा येथील आश्रमशाळेची तपासणी केली. शाळांना तत्काळ दुरुस्तीची नोटीस बजावली आहे. नोटिसांची कार्यवाही प्रकल्प कार्यालयांमार्फत सुरू असल्याने एकूण किती आश्रमशाळांना ही नोटीस बजावण्यात आली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, प्रकल्प अधिकारी आता ‘ॲक्शन मोड’वर आलेले दिसतात. नोटीस बजावूनही अनुदानित आश्रमशाळांनी दुरुस्ती न केल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जाते. १६-१ ‘त्या’ उपाययोजना अर्ध्यावर दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. नाशिक प्रकल्पातील २५ आश्रमशाळा व दोन वसतिगृहांतील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. त्यासाठी उपाययोजना म्हणून नाशिकचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण यांनी पाण्याच्या नवीन स्रोतांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना सुचविल्या होत्या. टँकरवर विसंबून न राहता वाहिनीद्वारे पाणी आणण्याचे किंवा साठवणूक करण्याचे नियोजन होते. दरम्यान, त्यांची बदली झाल्याने हा प्रस्ताव अर्ध्यावरच राहिला आहे. चौकट करणे १६-१ या आढळल्या प्रमुख त्रुटी आश्रमशाळांमध्ये मुलींच्या शौचालयाची दुरवस्था, राहण्यासाठी योग्य जागा नाही, पोषण आहाराचा दर्जा, गळके छत, अस्वच्छता व पाण्यासंबंधीच्या त्रुटी आढळल्या. अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन त्याची तपासणी केली आणि शाळानिहाय अहवाल तयार केला आहे. … कोट आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत की नाहीत, याची आम्ही तपासणी केली. काही आश्रमशाळांमध्ये गंभीर त्रुटी जाणवल्या. त्यांना तत्काळ नोटीस बजावली. तसेच, या संदर्भातील अहवाल अपर आयुक्तांकडे सादर केला आहे. - अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी, नाशिक विभाग --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com