फोटो :H28941
शिक्षकांनी चौकटीपलीकडे विचार करावा
गोविलकर : ब्राह्मण संस्थेतर्फे आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शिक्षण, पद, पैसा, प्रतिष्ठा महत्त्वाची असते पण, त्यातून आपले वेगळेपण काय? याचा शोध घ्यायला हवा. शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांपेक्षा चौकटी पलीकडचा विचार करून श्रेष्ठत्व सिद्ध करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहायक संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा झाला. त्र्यंबक रोडवरील संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ बँकेचे संचालक मनोज बाग, सनदी लेखापाल विद्यासागर जोशी, उद्योजक चित्रेश वस्पटे उपस्थित होते. प्रारंभी वेदमंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन आणि भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष अनिल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह ॲड. सुहास भणगे यांनी स्वागत केले. मोहिनी भगरे आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी यांनी आभार मानले.
--
११५ विद्यार्थ्यांचा गौरव
डॉ. एन.सी. गुजराथी, डॉ. बालसुब्रमण्यन, डॉ. एम. जी. कुलकर्णी, प्रा. जयंत भातांब्रेकर, प्रज्ञा कुलकर्णी, मुग्धा काळकर, राहुल मुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रावणी नांदुर्डीकर हिला पुढील शिक्षणासाठी ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. देणगीदार सतीश शुक्ल, मुकुंदराव कुलकर्णी, विजयकुमार क्षीरसागर, प्रवीण बुरकुले, ॲड. विजयराज तळेकर, राहुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
-----