शहर परिसरातून
तीन दुचाकींची चोरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : उपनगरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या असून, गोदाघाटावरून तर भरदिवसा दुचाकी लंपास केली आहे. रामतीर्थ परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. किरण प्रभाकर जाधव (रा. समाजकल्याण मुलांचे हॉस्टेल, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.४) सायंकाळी त्यांनी दुचाकी (एमएच- ४१- एएक्स- २३०३) रामतीर्थाजवळील संत देवमामलेदार समाधी मंदिरासमोरील यशवंत पटांगण येथे पार्क केली होती. दर्शन घेऊन परत आल्यावर गाडी गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.
इंदिरानगर परिसरातील शरयूनगरी येथून घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. भगत कल्पनाथ सहानी यांच्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्टला रात्री दुचाकी (एमएच १५ एफडी ७६०८) चोरीला गेली. इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार डोळस तपास करीत आहेत. तर, बोधलेनगर येथील आरटीओ कॉलनीतील पंचअमृत सोसायटीच्या आवारात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लांबवली. सुरेश ईश्वरदास गेहाणी यांनी शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाला दुचाकी (एमएच १५ एचजे ३६६०) घरासमोर पार्क केली असता, चोरी झाली केली. याप्रकरणी उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.