NSK26H28943
जळगाव : पीपल्स बँकेतर्फे आयोजित सोहळ्यात भरत अमळकर यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना श्लोक नैनेश सोनी व पालक. सोबत अनिकेत पाटील, राजू बाविस्कर, बँकेचे संचालक व पदाधिकारी.
----------
जळगाव पीपल्स बँकेतर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : येथील जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी (ता.६) यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजू बाविस्कर उपस्थित होते.
गेल्या मार्चमध्ये विविध शैक्षणिक परीक्षा व पदव्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या बँकेच्या सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांमधील १२८ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५०१, १००१ व ७५१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व डॉ. सुरेश हावरेलिखित पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपेक्षा ज्ञानाचा उपयोग, सातत्य व समाजाच्या प्रगतीत योगदान यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. श्री. अमळकर यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार कौशल्ये आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. श्री. बाविस्कर यांनी पालक-विद्यार्थी यांच्यातील संवाद व योग्य क्षेत्राची निवड महत्त्वाची असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन बँकेच्या व्यवस्थापक नीता वारुळकर यांनी केले. बँकेचे संचालक, अधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.