लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात
Published on
NSK26H28944 जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह माजी महापौर विष्णू भंगाळे, प्राचार्य डॉ. शशिकांत बऱ्हाटे आदी मान्यवर. --------- पटेल आदर्श पुरस्काराने ११ शिक्षकांचा सन्मान ------- जळगावात आयोजन; भोरगाव लेवा पाटीदार पंचायतचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे जळगाव विभाग व सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा रविवारी (ता.६) शहरातील लेवा भवनात पार पडला. यावेळी लेवा समाजातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ शिक्षकांचा शाल, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेचे मुख्य कार्यकारिणी सदस्य तथा जळगाव विभागाचे अध्यक्ष विष्णू भंगाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ममुराबाद येथील अरुणामाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत बऱ्हाटे प्रमुख पाहुणे होते. सुरवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ११ शिक्षकांचा शाल, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. प्रशांत वारके, पुरस्कारार्थी शिक्षक संदीप भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैशाली झोपे यांनी केले. महेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी बिपीन झोपे, प्रफुल्ल सरोदे, अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, राहुल चौधरी, देवेंद्र चौधरी, गणेश लोडते, विजय नारखेडे आदींनी परिश्रम घेतले. -------- पुरस्कार प्राप्त शिक्षक असे संदीप काशिनाथ भंगाळे (मुख्याध्यापक, नूतन ज्ञानमंदिर, अडावद), दिनेश अरुण महाजन (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव), धनश्री कृष्णकुमार फालक (मुख्याध्यापिका, गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव), नेहा निखिल जंगले (मुख्याध्यापिका, शकुंतला जे. प्राथमिक विद्यालय, जळगाव), हरीष बाबुराव तळेले (पी. के. गुळवे माध्यमिक विद्यालय, जळगाव), जयश्री रामकृष्ण भंगाळे (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, जळगाव), पुनम राजेंद्र कोल्हे (ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव), पल्लवी गिरीश पाटील (भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव), प्रीती पराग जावळे (भा. का. लाठी प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव), स्वाती धनंजय फिरके (शा. ल. खडके प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव) व पुनम सतीश पाटील (ज. सु. खडके प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com