शिक्षक दिन कार्यक्रम

शिक्षक दिन कार्यक्रम
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... मेन -- फोटो क्रमांक : 28946 दोंडाईचा : नगर परिषद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने झालेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात गौरविण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसह पालकमंत्री जयकुमार रावल. -- फोटो क्रमांक : 28854 धुळे : शिक्षकदिनी डी. डी. विसपुते विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन वेळी उपस्थित एक दिवसासाठी शिक्षक झालेले विद्यार्थी. -- विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली कृतज्ञता -- शिक्षक दिनी जिल्ह्यात गुरुजनांचा गौरव; विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : माजी राष्ट्रपती आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला शहर आणि जिल्ह्यात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणे आणि जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षकांचे मुख्य कार्य आहे, ही भावना जिल्हाभरात व्यक्त झाली. विविध संस्थांमध्ये पुरस्कार वितरण, शैक्षणिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत स्वयं-शासन राबवण्याचे उपक्रम पार पडले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक दिवस प्रत्यक्ष शिक्षक व प्रशासकीय पदांची धुरा सांभाळली. - दोंडाईचा नगर परिषद दोंडाईचा- वरवाडे नगर परिषद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने झालेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील २७ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा गौरव सोहळा झाला. पालकमंत्री रावल म्हणाले, की शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे शिल्पकार आहेत. आई- वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शाळांमधून सामाजिक जाणीव असलेले जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वाढली असली, तरी संस्कार व मूल्ये देण्यासाठी शिक्षकांची जागा कायम अढळ राहील, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात प्रदीप पाटील, शेख खाटीक, मनीषा पाटील, संजय चौधरी, हबीबु अन्सारी, संदीप ईशी, मनीषा बंजारा, शेख कमरुद्दीन, दीपक कोल्हाटी, संगीता पाडवी, शेख रफिक, प्रदीप सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, निळकंठ कुलकर्णी, मनोजकुमार ठाकूर, ललित कंवर, उर्मिला पाटील, प्रविण माळी, सचिन पाटील, सुंदरी अबीरामी, सुचिता पवार, फरहाना पिंजारी, जयसिंग गिरासे, अशोक सावंत, सुरेंद्रसिंग गिरासे, कोंकेंद्र वाडीले आणि मनीषा घुगे या २७ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. उपनगराध्यक्ष विजय पाटील, शिक्षण सभापती वैशाली कागणे, भाजप दोंडाईचा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, कृष्णा नगराडे, जितू गिरासे, भैया धनगर, अक्षय चव्हाण, सचिन सोनवणे, संजय रामुडे, निखिल राजपूत, बांधकाम सभापती मुकेश देवरे, माजी नगराध्यक्ष रमेश कुकरेजा, भरत ठाकूर, राकेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, हितेंद्र महाले आदी उपस्थित होते. - नवजीवन इंग्लिश स्कुल शहरातील साक्री रोड परिसरात सिंचन भवनच्या मागे असलेल्या नवजीवन इंग्लिश मेडियम स्कूल येथे शिक्षक दिन साजरा झाला. न्यूरो फिजिशियन व भाजपा प्रदेश महासचिव डॉ. सुशील महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. श्री. रेलन यांनी मार्गदर्शन करत देव जीवन देतो, आई- वडील वाढवतात आणि शिक्षक जीवनाला दिशा देतो. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षकांचे काम असल्याचे सांगितले. डॉ. महाजन यांनी बदलत्या डिजिटल युगात शिक्षकांची जबाबदारी वाढल्याचे सांगत शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. डॉ. संजय सदाने यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये भाषणे व नृत्यनाटिका सादर केली. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिक्सर-ग्राइंडर भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य मंगेश पवार यांनी आभार मानले. सलोनी मंदान यांनी सूत्रसंचालन केले. - विद्याधन महाविद्यालय वलवाडी (ता. धुळे) येथील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालय येथे शिक्षक दिन सोहळा पार पडला. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक योगदानावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. जागृती पाटील यांनी शिक्षकांचे योगदान स्पष्ट केले. अतुल ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीवर प्रकाश टाकला तर प्रा. भूषण पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. प्रा. प्रियंका घरोटे यांनी सूत्रसंचालन केले. तनुष्का मोरे, तृप्ती गिरासे, क्रिष्णा पाटील आणि उज्जल सोनगीरे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले. प्रा. डॉ. योगेश बोरसे, प्रा. कविता पाटील, प्रा. करिष्मा पाटील, प्रा. दिव्या पाटील, प्रा. तेजश्री त्रिभूवन, प्रा. सायली चौधरी, प्रा. दर्शना पटेल, प्रा. दिक्षा सोनवणे, प्रा. हेमांगीनी चौधरी, आकाश उफाडे, मोनाली वाघ, प्रथमेश शर्मा, सोनल पाटील, पूनम पाटील, सागर मासुळे आणि चुडामण ठाकरे उपस्थित होते. - पिंपळादेवी विद्यालय मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेत शिक्षक दिन साजरा झाला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शालेय प्रशासनाची व अध्यापनाची सूत्रे हाती घेतली. विद्यार्थी रईस फकीर, गौरव जांभोरे आणि धनंजय चव्हाण यांनी अनुक्रमे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची भूमिका बजावली. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून वर्गांवर अध्यापन केले. सृष्टी सोनार, दर्शना शिरसाठ, लावण्या पाटील, धनश्री पाटील, योगिता मोराणकर, रोशन जाधव, लोकेश पाटील आणि उपशिक्षक शेखर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. धनंजय चव्हाण व वैष्णवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एन. सोनवणे, बी. जी. पाटील, एस. डी. देवरे, व्ही. बी. कापडणीस, एस. जी. पवार, डी. ए. देवरे, आर. एन. सोनवणे, के. के. पाटील आणि एस. बी. सोनवणे उपस्थित होते. - सिसोदे महाविद्यालय नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. उषाताई तनपुरे विज्ञान महाविद्यालय आणि श्रीमती आर. एम. सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती दिली. श्री. सिसोदे यांनी युवकांना शिक्षणाद्वारे राष्ट्रविकासात योगदान देण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, प्रा. डी. एस. ढिवरे, रूपाली शेलार आणि छाया फुले यांनी मनोगत व्यक्त केले. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ए. पी. निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली धनराज यांनी आभार मानले. प्रा. एस. एम. सिसोदे, प्रा. पी. जी. सोनवणे, प्रा. व्ही. बी. खैरनार, प्रा. बी. एम. पाटील, प्रा. डॉ. राहुल भदाणे, शैलेंद्र सिसोदे आदींनी संयोजन केले. - एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा (ता. धुळे) येथील अ.यु.क.के. संचलित एकनाथ महाराज हायस्कूल येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक के. पी. पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारून शाळेचे कामकाज सांभाळले. प्रीती खर्चे हिने मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी पार पाडली. तर जानवी धुमाळ हिने सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद साळुंखे यांनी आकर्षक फलकलेखन केले. चंद्रकांत भदाणे यांनी आधुनिक युगातील शिक्षकांचे कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. सचिन पावरा, नित्यानंद पवार, मंगला देसले आणि सांस्कृतिक प्रमुख संजय सूर्यवंशी यांनी संयोजन केले. - आघाव अध्यापक विद्यालय श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या आघाव अध्यापक विद्यालयात प्राचार्य पी. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य प्रा. एम. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन झाला. प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्र- अध्यापकांनी शाळा सांभाळली. प्रांजल देशमुख हिने मुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहिले. मोहन पाटील, लकी बेडसे, दीपाली गर्दे, वैष्णवी बागले, स्नेहा सोनवणे, भाग्यश्री बोरसे, मोहन टेळे आणि शहाजी टिळे यांनी अध्यापन केले. तर सचिन घुले, विवेक मालचे, योगेश सोनवणे आणि योगेंद्र चौधरी यांनी शिपायाची भूमिका पार पाडली. अहिरे वैदेही व लीना भोये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिता देवरे, प्रा. बी. के. मराठे आणि प्रा. एच. आर. बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पी. एम. पाटील, प्रा. व्ही. आर. पाटील, ग्रंथपाल प्रमोद बोरसे आणि चेतन भामरे उपस्थित होते. - जयहिंद मराठी शाळा जयहिंद मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. मोहन मोरे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. डॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शालिनी वाघ यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. - विसपुते महाविद्यालय वलवाडी (ता. धुळे) परिसरातील बापूसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका योगिता बारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. बारी, प्राचार्य मीनाक्षी महाले, प्रा. दीपक चौधरी, प्रा. वैशाली साळी, प्रा. सारिका बडगुजर, प्रा. बळीराम शिंदे, प्रा. नितीन बडगुजर, प्रा. शितल पाखरे, अर्चना जाधव, विजय पवार, प्रज्ञांकुर गवळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. - अभय विद्यालय येथील अभय माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक संजय पवार यांच्या मार्गदर्शनात शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणून कामकाज केले. डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा परिचय देण्यात आला. मुख्याध्यापक पवार, विद्यार्थिनी मुख्याध्यापिका महिमा शिंदे, विद्यार्थी पर्यवेक्षक प्रेम पाटील, शिक्षक जे. बी. सोनवणे, मोहमंद जैद, मयुरी पाटील आदी उपस्थित होते. - जिजामाता विद्यालय श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था संचलित जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी प्राचार्य, शिक्षक, लिपिक आणि शिपाई पदाच्या भूमिका पार पाडल्या. प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. अडकमोल, संगीत शिक्षिका मनिषा गोसावी, एल. के. गवळी, एस. पी. देवरे आदींसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. - विसपुते विद्यालय बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगतांच्या माध्यमातून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकाने कामकाज सांभाळत नियोजन केले. प्राचार्य पाटील, एस. आर. पाटील, डी. डी. पवार, ए. के. पाटील, एस. बी. भदाणे, योगेंद्र पाटील, विद्यार्थी मुख्याध्यापक अमित भिल, विद्यार्थी उपमुख्याध्यापक तेजस्विनी कोळी, मनीषा सूर्यवंशी, निलिमा महाले, पावरा भायसिंग, अपर्णा पाटील, राजश्री मासुळे, विजय देसले, महेंद्र बाविस्कर, महेश पाटील, डॉ. जयेश गाळणकर, तुषार कुलकर्णी, अभिज्ञ पवार, ललित शिंदे, विलास भामरे, महेश पवार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. - एसआरबी स्कूल दहिवद (ता. शिरपूर) येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून विविध वर्गांमध्ये अध्यापनाचा अनुभव घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी, नृत्ये आणि नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com