धुळे : टुडे पान ३ साठी... अवतीभवती
--
छत्रपती स्कूलमध्ये
दहीहंडीचा जल्लोष
धुळे : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हरणमाळ (ता. धुळे) येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, एकजूट आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रकल्प समन्वयक एस. बी. पाटील, प्राचार्य आशिष काटे आणि प्रशासकीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. राधा- कृष्णाच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘गोविंदा आला रे आला’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शाळेतील चार हाऊसमध्ये झालेल्या स्पर्धेत निलगिरी हाऊसने २१ मिनिटे १४ सेकंदात मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडत प्रथम क्रमांक मिळवला. सातपुडा, सह्याद्री आणि अरवली हाऊसच्या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
--
ज्येष्ठ नागरिक
मंडळात कार्यक्रम
धुळे : येथील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळात शिक्षक दिन आणि दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. अध्यक्ष एन. पी. वाणी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठांनी गाण्यांवर ठेका धरत बाळकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडली. त्यानंतर निकम पॉलिटेक्निकचे संस्थापक रवींद्र निकम, शुभांगी निकम, विद्यावर्धिनीचे संचालक पितांबर महाले, भूलतज्ज्ञ डॉ. रमेश तळेले, ॲड. एम. एस. पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा झाला. पिंपळादेवी विद्यालय मोहाडी संस्थेला मानपत्र आणि बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. सावंत, संजय पाटील, राजेंद्र शिंदे, अरुण पाटील व शिक्षकांचा तसेच सभासद शिक्षकांचा सत्कार झाला. यादी वाचन अरविंद पाखले, उत्तमराव बोराडे, चंद्रकांत कोतकर, चंपा अग्रवाल यांनी केले. तर मानपत्र वाचन डी. व्ही. कोठावदे यांनी केले. कमलताई कोठावदे, प्रमोद पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. साहेबराव पाटील यांनी आभार मानले. आर. के. वाणी यांनी पसायदान म्हटले. उपाध्यक्ष साहेबराव पाटील, कार्याध्यक्ष बी. एन. जोशी, कोषाध्यक्ष डी. व्ही. कोठावदे, सचिव उत्तमराव बोराडे, सहसचिव अरुण बाविस्कर, बाजीराव खैरनार, मगन कोठावदे आदींनी संयोजन केले.
--
दोंडाईचात रावल
फार्मसीत शिबिर
धुळे : दोंडाईचा येथील दादासाहेब रावल फार्मसी कॉलेजमध्ये ‘औषधनिर्माणशास्त्र व करिअर संधी’ या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर पार पडले. या वेळी फार्माविझचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल अजीम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील शिष्टाचार, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धात्मक युगात स्वतःचे वेगळे अस्तित्व कसे निर्माण करावे, यावर मार्गदर्शन केले. शिबिराला डी. फार्मसी आणि बी. फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. घनश्याम चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. प्रा. रमिज खान यांनी सूत्रसंचालन केले.