पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रानभाज्या महोत्सवाची सांगता

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रानभाज्या महोत्सवाची सांगता
Published on
पान-३ NSK26H28968 नाशिक ः पिंक ई-रिक्षातून प्रवास करताना पालकमंत्री गिरीश महाजन, सीईओ ओमकार पवार. NSK26H28969 नाशिक ः रानभाज्या महोत्सवात बचत गटांच्या स्टॉलला भेट देत पाहणी करताना मंत्री महाजन. --- ३६-४ कुंभमेळ्यात महिला बचत गटांना प्राधान्य पालकमंत्री गिरीश महाजन : रानभाज्या महोत्सवात दहा लाखांची उलाढाल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. रानभाज्या, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराच्या प्रसारासाठी रानभाज्या महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आकांक्षित तालुका कार्यक्रम आणि ‘उमेद’ यांच्यातर्फे नाशिक पंचायत समितीच्या आवारात आयोजित ‘रानभाज्या महोत्सव व आकांक्षा हाट’ला पालकमंत्री महाजन यांनी शनिवारी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक महेश पाटील, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका आदिती पांडे आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या तीन दिवसांत दहा लाख ११ हजारांवर उलाढाल झाली. पालकमंत्री महाजन म्हणाले, महिलांनी केवळ बचत गटापुरते मर्यादित न राहता उत्पादन, विक्री, खाद्यपदार्थ आणि विविध सेवा क्षेत्रांत पुढे यावे. महिलांच्या हातात रोजगाराचे साधन दिल्यास त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. ‘उमेदच्या माध्यमातून राबविण्यात येणारे पिंक ई-रिक्षासारखे उपक्रम महिला आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. … १६-१ पिंक ई-रिक्षातून प्रवास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महोत्सवास केवळ भेट दिली नाही, तर महिलांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी ‘पिंक ई-रिक्षा’तून प्रवास केला. महिला बचत गटांनी मांडलेल्या खाद्य पदार्थांची चव चाखली. रानभाज्यांची खरेदी करत त्यांना आर्थिक पाठबळ दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com