धुळे : टुडे पान २ साठी... सिंगल
--
न्यू सिटी हायस्कूलमध्ये
विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन
धुळे, ता. ६ : लोकशाही मूल्यांची रुजवण आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने धुळे एज्युकेशन सोसायटीच्या कि. सो. क. न्यू सिटी हायस्कूलमध्ये १६ सदस्यीय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच झाला. मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी औपचारिक शिस्त पाळत प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. मंत्रिमंडळात शालेयमंत्री नयन बागुल, उपशालेयमंत्री स्वामी महाले, शिक्षणमंत्री हर्षल मिस्तरी, उपशिक्षणमंत्री कृष्णा पाटील, क्रीडामंत्री भावेश वाणी, उपक्रीडामंत्री श्लोक गायकवाड, सांस्कृतिक मंत्री कल्पेश गवळी, उपसांस्कृतिक मंत्री गगन राजपूत, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जैद पिंजारी, उपविज्ञान व तंत्रज्ञानमंत्री निखील हिरे, पर्यावरण मंत्री सोहम गवळी, उपपर्यावरण मंत्री प्रथमेश चव्हाण, अर्थमंत्री तनय पाटील, उपअर्थमंत्री रोहन शर्मा, कामकाजमंत्री रुद्र बच्छाव आणि उपकामकाजमंत्री रितेश ठोंबरे यांनी पदभार स्वीकारला. या प्रसंगी उपमुख्याध्यापक एस. व्ही. भामरे, नेतृत्व विकसन प्रमुख डॉ. नंदकिशोर बागुल, उपप्रमुख एन. एल. ठाकूर, मीनाक्षी पाटील व पालक उपस्थित होते. नंदकिशोर बागूल यांनी प्रास्ताविक केले. एस. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. एल. ठाकूर यांनी आभार मानले.