आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागाची, औषधसाठ्याची तपासणी

आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागाची, औषधसाठ्याची तपासणी
Published on
पान-३ NSK26H28972 रासेगाव : येथील आरोग्य केंद्रातील तपासणीनंतर शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीईओ ओमकार पवार. --- ३६-४ आरोग्य केंद्रासह शाळांची तपासणी जिल्हा परिषद सीईओ ओमकार पवार यांची उमराळे, रासेगावला अचानक भेट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : दिंडोरी तालुक्यातील उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग, औषधसाठा, स्वच्छता व पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले. उमराळे व रासेगाव येथील आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळांना शुक्रवारी (ता. ४) त्यांनी अचानकपणे भेट दिली. आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. उमराळे येथे भेटीदरम्यान सीईओ पवार यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, वाचन-लेखन, तसेच मूलभूत गणितीय कौशल्यांची स्थिती काय आहे, याबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अभ्यास, तसेच वाचन, लेखन आणि गणित विषयातील प्रगतीबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, संबंधित वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. --- विद्यार्थ्यांशी संवाद रासेगाव शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासाची पद्धत, आवडते विषय, वाचनाची सवय आणि भविष्यातील ध्येय याबाबत संवाद साधला. नियमित वाचन, लेखनाचा सराव आणि मूलभूत गणितीय कौशल्ये विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निपुण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com