NSK26H28986
जळगाव : महादेव हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे बसविलेल्या पाच हेमोडायलिसिस मशीनच्या लोकार्पणप्रसंगी महापालिकेचे आयुक्त आदित्य जिवने, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, क्लबचे पदाधिकारी.
-----
‘हेमोडायलिसिस’ यंत्रांद्वारे गरजू रुग्णांना सुविधा
------
रोटरी क्लब नॉर्थतर्फे लोकार्पण; महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने महादेव हॉस्पिटल येथे ग्लोबल ग्रँट प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या पाच हेमोडायलिसिस मशीनचे लोकार्पण महापालिकेचे आयुक्त आदित्य जिवने यांच्याहस्ते रविवारी (ता.६) झाले.
यावेळी क्लबचे आयपीडीजी ज्ञानेश्वर शेवाळे, प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राजेंद्र भामरे, डॉ. वैभव पाटील व डॉ. केतकी पाटील उपस्थित होते. प्रकल्पामुळे गरजू रुग्णांना हेमोडायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. रोटरी क्लब जळगाव नॉर्थचे अध्यक्ष उमेश पाटील, सचिव आरटीएन रुपेश सरोदे, प्रकल्प सचिव प्रशांत अग्रवाल, प्रकल्प समन्वयक चंदन कोल्हे, मेडिकल कमिटी सदस्य डॉ. शौनक पाटील, क्लब एडिटर व प्रकल्प अध्यक्षा कश्मीरा जैन, पवन जैन, माजी अध्यक्ष बिपिन पाटील, माजी सचिव हितेंद्र धांडे, भरत कर्डिले यांच्यासह रोटेरियन, मान्यवर, सदस्य, मित्रपरिवार व कुटुंबीय उपस्थित होते.