फोटो : H28984
बालरंगभूमी परिषदेतर्फे
‘जल्लोष लोककलेचा’
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : गोंधळ, भारुड, लावणी, पोवाडा, कोळीगीते, धनगरी नृत्ये, वाघ्या-मुरळी आणि लेझीम यांसारख्या लोककलांनी समाजाचे प्रबोधन केले. ढोलकी, तुणतुणे, हलगी आणि झांज सारख्या तालवाद्यांची लोकपरंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे काळाची गरज आहे. या उद्देशाने बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेतर्फे बाल व युवा कलाकारांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन १९ सप्टेंबरला अशोकस्तंभावरील पुष्पावती रुंगठा शाळेत करण्यात आले आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवात एकल वादन, नृत्य, गायन तसेच समूह गायन, नृत्य प्रकार सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. स्पर्धेतील गुणवंत कलाकारांना भरघोस पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्यांना २ व ३ ऑक्टोबरला मुबईतील यशवंत नाट्यगृह येथील अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असून अधिक माहितीसाठी (८६००२८२७३९) (९२७०४८१८४४) क्रमांकावर संपर्क साधावा.
-- कोट
आधुनिक तंत्रज्ञानाच्या समाज माध्यमांत वावरणाऱ्या पिढीला आपल्या पारंपरिक लोककला, वाद्य परंपरा कळावी. या हेतूने लोककलेच्या माध्यमातून हक्काचा मंच मिळावा या उद्देशाने महोत्सव घेण्यात येत आहे.
- महेश डोकडोफे, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, नाशिक शाखा
-------