कॅनडा कॉर्नरवरील हल्ल्याप्रकरणात ११ संशयितांना बेड्या

कॅनडा कॉर्नरवरील हल्ल्याप्रकरणात ११ संशयितांना बेड्या
Published on
पान-२ ---- युवकावरील हल्ल्याप्रकरणी टोळक्याची धिंड --- अकरा संशयितांना बेड्या ः टवाळखोराविरोधातील मोहीम तीव्र होणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : कॅनडा कॉर्नर परिसरात क्षुल्लक कारणावरून संशयित टोळक्याने युवकावर प्राणघातक हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने फरारी झालेल्या अकरा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. टवाळखोरांविरोधात पोलिसांनी मोहीमच उघडली असून, येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. अटक केलेल्या या टोळक्याची कॅनडा कॉर्नर परिसरातून धिंडही काढण्यात आली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित टोळक्याविरोधात ॲट्रॉसिटीसह ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या २ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संशयित फरारी होते. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते. हवालदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे यांना संशयित शहरात दडून असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी बेथेलनगर, काळेनगर, संत कबीरनगर, पाथर्डी फाटा व सिडको परिसरात एकाच वेळी शोधमोहीम राबवून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या सर्वांना सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख व अंमलदारांनी बजावली. १६-१ ताब्यात घेतलेले संशयित तमील मुर्गेशन गौडा (वय २३, रा. येरूशलेमनगर, शरणपूर रोड), आकाश छोटू पाटील (२३, रा. सिडको), निकेतन निंबा पाटील (२०, रा. पाथर्डी फाटा), आशिष राजू वाघमारे (२३, रा. आनंदवली, गंगापूर रोड), प्रेम शांताराम भगत (१८, रा. शरणपूर), सॅमसंग मयूर चित्रे (२१, रा. बेथेलनगर), अजय प्रेमदास श्रीवास्तव (५३, रा. शरणपूर रोड), चेतन रवींद्र तगे (२८, रा. सिओननगर), नीतू हेमंत गायकवाड (३७, रा. कॅनडा कॉर्नर), प्रीती रोहित शिंदे (२५, रा. कॅनडा कॉर्नर), अपर्णा सनी चव्हाण (३३, रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक). -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com