माहेश्वरी समाजातील १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

माहेश्वरी समाजातील १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Published on
NSK26H29004 जळगाव : प्रज्ञा गौरव सोहळ्यात माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान करताना मान्यवर. ------------ माहेश्वरी समाजातील गुणवंतांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१३ : जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे माहेश्वरी समाजातील गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी प्रज्ञा गौरव सोहळा २०२६ हा उपक्रम उत्साहात नुकताच झाला. रिंग रोडवरील महेश प्रगती मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात १३० गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. समारंभाची सुरुवात महेश पूजन व महेश वंदनेने झाली. पुणे येथील अशोक नवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा माहेश्वरी सभेच्या २०२६ ते २०२९ या कार्यकाळातील रंगीत डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. अशोक नवाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, गुणवत्ता, संस्कार व भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष तेजस देपुरा यांनी सभेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व आगामी नियोजनाची माहिती दिली. महेश गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त झाल्याबद्दल शुभांगी दिनेश राठी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. प्रज्ञा गौरव समितीचे प्रमुख प्रा. केशरलाल भदादे, सहप्रकल्प प्रमुख दीपक कासट व संतोष झवर यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत लाहोटी व वैष्णवी झवर यांनी केले. अरुण लाहोटी यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर जिल्हा माहेश्वरी सभेची सर्वसाधारण बैठक घेऊन विविध उपक्रमांचा आढावा व आगामी कार्याबाबत चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com