दुहेरी उत्पन्नाची पर्वणी

दुहेरी उत्पन्नाची पर्वणी
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... मेन -- फोटो क्रमांक : 29015 चिवटीबारी (ता. साक्री) : पर्यटनस्थळ परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मका विक्री दुकानांवर होणारी गर्दी. (छायाचित्र : भिलाजी जिरे) -- चिवटीबारीतील शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाची पर्वणी -- मक्याची कणसे ठरली सोन्याची; पर्यटकांच्या पसंतीने पालटले चित्र; शेतकरी समृद्ध सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. ७ : साक्री तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ चिवटीबारी परिसरात पावसाळी पर्यटनाला मिळालेली मोठी चालना शेतकरी वर्गासाठी वरदान ठरली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराची हक्काची संधी तर मिळालीच आहे. शिवाय पर्यटनाच्या या ओघात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला थेट बाजारपेठ मिळाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळाली आहे. येथील मक्याच्या कणसांच्या विक्रमी विक्रीतून शेतकऱ्यांना कणसे आणि हिरवा चारा या दोन्हीच्या माध्यमातून दुहेरी आर्थिक लाभ होत असून, परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. - तालुक्यातील विजयपूर परिसरातील चिवटीबारीसह शेंदवड भवानी आणि भुईपाऊल या निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर कोसळणारे धबधबे, दाट जंगल आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची तुडुंब गर्दी होत असते. पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि खाद्यान्नाची गरज भागवण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी चहा, पाववडा, खिचडी, पुलाव तसेच भाजलेली व शिजवलेली मक्याची कणसे आणि ताजी काकडी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. पावसाळ्यात गरमागरम कणसांना पर्यटकांकडून मिळणाऱ्या विशेष पसंतीमुळे स्थानिकांच्या रोजगाराला आणि आर्थिक सुबत्तेला मोठा हातभार लागला आहे. - स्वीट कॉर्नला पसंती या पर्यटनाच्या वाढत्या संधीचा फायदा घेत परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात म्हणजेच जून महिन्यात लागवड केलेले स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न व चारा मक्याचे पीक वेळेत बाजारात आणले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या उत्तम निगेमुळे व समयबद्ध व्यवस्थापनामुळे दर्जेदार उत्पादन मिळाले असून, साधारण ७५ ते ८० दिवसांत हे पीक पूर्णपणे तयार झाले आहे. स्थानिक बाजारपेठेसह साक्री तालुका आणि शेजारील गुजरात राज्यातूनही व्यापारी थेट शेतात येऊन मक्याची कणसे खरेदी करत आहेत. या ठिकाणी दररोज दोन ते तीन हजार मक्याची कणसे, अन्य खाद्य पदार्थ विक्री होत आहेत. यातून हजारोंची उलाढाल होते आहे. काढणी व वाहतूक व्यापारीच करत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली असून, सध्या मक्याला बाजारभावापेक्षा अधिकचा समाधानकारक दर मिळत आहे. - आरोग्यदायी मका पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या शिजवलेल्या व भाजलेल्या मक्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन बी- कॉम्प्लेक्स मज्जातंतू व ऊर्जेसाठी उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर व्हिटॅमिन ए व अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय फायबर (उकडलेल्या मक्यात जास्त), कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम घटक असल्याने आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या मक्याला मोठी मागणी आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ दुहेरी उत्पन्नाची पर्वणी कणसांची विक्री झाल्यानंतर उरलेल्या पिकापासून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचा हिरवा चारा मिळत आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा हक्काचा स्रोत उपलब्ध झाला असून, एकाच पिकातून पर्यटन आणि शेती अशा दोन्ही बाजूंनी दुहेरी आर्थिक लाभ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील पर्यटनाचे आकर्षण आणि स्थानिक शेतीमालाला मिळालेली ही हसरी बाजारपेठ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com