टुडे ३ ॲंकर
NSK26H29065
जळगाव : श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील खोटेनगर परिसरातील कुबरेश्वर मंदिरात अमरनाथ येथील बाबा बर्फानीची साकारण्यात आलेली पिंड.
--
भवानी मंदिरात केदारनाथाचा देखावा
श्रावण सोमवार महोत्सवाचा समारोप; भजनसंध्येला भाविकांचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : सुभाष चौक, सराफ बाजार परिसरातील श्री भवानी तथा महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या श्रावण सोमवार महोत्सवाचा सोमवारी (ता. ७) उत्साहात समारोप झाला. यानिमित्त मंदिर सभागृहात हिमालयातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. आकर्षक आरास आणि फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसराला भक्तिमय झाला होता.
श्रावण सोमवारनिमित्त दुपारी तीनला ११ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. आचार्य म्हणून राजा जोशी यांनी पौरोहित्य केले. गंगाजल, नर्मदा जल, दूध, गुलाबजल, उसाचा रस, नारळपाणी, तूप, पंचगव्य आणि सुगंधी जलाने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी विशेष शृंगार व पूजनानंतर महाआरती करण्यात आली. भाविकांसाठी साकारलेली आठ बाय आठ फूट आकाराची व दहा फूट उंच केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. महाआरतीनंतर ‘हर घर सुंदरकांड भजन मंडळा’तर्फे भजनसंध्या झाली. प्रमुख गायिका दीपा तापडिया यांच्यासह किरण शर्मा, मेघराज सोनी व प्रदीप जोशी यांनी शिवभजने सादर केली. भजनांवर भाविकांनी ठेका धरत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान कलावंत व मंदिर सेवकांचा सत्कार करण्यात आला. रात्री शयनआरतीनंतर गोपाल तिवारी व उत्तम जोशी परिवारातर्फे दुग्धप्रसादाचे वाटप करण्यात आले.