मस्ट
फोटो : 29032
नंदुरबार ः शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल बुरले, डॉ. भारती सोनी, डॉ. गिरीश पाटील, डॉ. दिलीप तेली, डॉ. हेमंत महाले, कल्पना वसावे आदी.
--------------------
पी. जी. महाविद्यालयात
गुरुजनांचा सन्मान
नंदुरबार, ता. ९ : येथील पी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात (आयुर्वेद) शिक्षक दिन झाला. या वेळी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आलले. यानिमित्त गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनिल बुरले अध्यक्षस्थानी होते. डॉ. भारती सोनी, डॉ. गिरीश पाटील, डॉ. दिलीप तेली, डॉ. हेमंत महाले, कल्पना वसावे उपस्थित होत्या.
धनश्री जाधव, आस्था बुटे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी गौरी नेटके व श्रद्धा कांबळे यांनी गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मसीरा अन्सारी, हितेश प्रजापती गीत सादर केले.
त्यानंतर विविध मनोरंजनात्मक खेळ झाले. डॉ. दिलीप तेली यांनी मिमिक्री सादर केली. खेळांमध्ये प्राचार्य डॉ. अनिल बुरले, डॉ. भारती सोनी आणि डॉ. गिरीश पाटील, डॉ. दिलीप तेली, डॉ. हेमंत महाले आणि कल्पना वसावे यांनी सहभाग घेतला. समारोपावेळी डॉ. सोनी यांनी कविता सादर केली. शिक्षक-विद्यार्थ्यांमधील स्नेह, आदर आणि आपुलकीचे दर्शन घडविणारा हा शिक्षक दिन उत्साहात झाला.