राष्ट्रीय पोषण माह

राष्ट्रीय पोषण माह
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... अँकर -- फोटो क्रमांक : 29027 - एआय इमेज -- नवव्या राष्ट्रीय पोषण माहचा उद्यापासून शुभारंभ -- ‘आमची अंगणवाडी आमची जबाबदारी’ संकल्पना; जिल्ह्यातही अंमलबजावणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : देशातील महिला व बालकांच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी आणि कुपोषणावर मात करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने नवव्या ‘राष्ट्रीय पोषण माह २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावरील प्रारंभ बुधवारी (ता. ९) उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे औपचारिकपणे होणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ यांनी दिली. - नऊ सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर असा महिनाभर हा पोषण महा राहील. ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत वैयक्तिक व समुदाय स्तरावर पोषणाविषयी जाणीव जागृती निर्माण करून वर्तनात्मक बदल घडवून आणणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. या वर्षीच्या पोषण माहाची ‘आमची अंगणवाडी आमची जबाबदारी’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली असून, याद्वारे अंगणवाडी केंद्रांना समुदायाच्या नेतृत्वाखालील उपक्रमांच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प आणि संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. वाराणसी येथील केंद्रीय समारंभ पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातही ग्रामपातळीवर पोषण मेळावे, प्रथिनयुक्त ताट स्पर्धा, पोषण वाटिकेचे प्रदर्शन, तसेच अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले जाईल. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुला- मुलींपर्यंत या योजनांचे लाभ पोहोचवून शतप्रतिशत संपृक्तता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ पाच मुख्य थीम या संपूर्ण अभियानात प्रामुख्याने पाच मुख्य थीमवर सलगरीत्या भर दिला जाणार आहे. यात पहिल्या थीम अंतर्गत आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिनयुक्त घटक, धान्य, कडधान्ये, फळे व भाज्या, तसेच वनस्पती व प्राणिजन्य स्रोतांचा वापर करून आरोग्यदायी पाककृतींचे प्रात्यक्षिक व पोषण मेळावे आयोजित केले जातील. दुसऱ्या थीममध्ये अंगणवाडी केंद्रांमध्ये ताजे गरम शिजवलेला आहार नियमितपणे उपलब्ध करून देणे, साप्ताहिक मेनू बदल करणे आणि स्वच्छतेवर भर दिला जाईल. तिसऱ्या थीमनुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि एसएनपी मेनू बोर्डच्या माध्यमातून समुदायाची मालकी व उत्तरदायित्व बळकट केले जाईल. चौथ्या थीममध्ये बालकांच्या विकासासाठी पोषण आणि प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षण यावर भर देऊन बालकांचे योग्य संगोपन व विकासात्मक टप्पे तपासले जातील. पाचव्या थीम अंतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाच्या माध्यमातून मातृ आरोग्यासाठी रोख लाभ हस्तांतरण आणि शतप्रतिशत लाभार्थी संपृक्तता मोहीम राबवली जाईल. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com