NSK26H29028
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात संस्कृत सप्ताहाचे उद्घाटन करताना डॉ. उल्हास पाटील व मान्यवर.
-------
डॉ. सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.७ : येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपणे आणि आयुर्वेदातील मूळ संस्कृत ग्रंथांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, प्रसार व प्रचाराच्या उद्देशाने आयोजित ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात पार पडला.
सप्ताहभराच्या या आयोजनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये संस्कृत संभाषण कार्यशाळा, श्लोक पठण स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा खानापूरकर, राजश्री देशमुख, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्राचार्य डॉ. शिवानंद आठवले आदी उपस्थित होते. प्रा. अमिता निकम यांनी प्रास्ताविक केले.
--------