NSK26H29031
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील तिघा संशयितांकडून पोलिसांनी जप्त केलेले साहित्य व गुन्हा उघडकीस आणणार्या पथकासह निरीक्षक बबन अव्हाड
गुरांच्या बाजारातील दुकान फोडणारे अटकेत
जळगावातील घटना; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांच्या हाती बेड्या
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : औद्योगिक वसाहत परिसरातील गुरांच्या बाजाराच्या आवारातील संकुलात मातोश्री इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान फोडून चोरट्यांनी तांब्याची तार, जुन्या वीज मोटारी असा सुमारे ८० हजारांचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयितांनी अटक केली आहे.
औद्योगिक वसाहत परिसरातील जनावरांना बाजारातील ''मातोश्री'' इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. दुकानातून ४० किलो वजनाची तांब्याची नवीन व जुनी तार तसेच ८ मोटार चटई लूमसाठी लागणारे रिपेअरिंग साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी दुकान मालक किशोर सुभाष पाटील (वय ४२) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज संकलन
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने प्रभारी अधिकारी बबन आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व गुन्हेशोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे संकलन केले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ३ संशयितांना ताब्यात घेतले.
तिघे पथकाच्या ताब्यात
हर्शल गोपाळ परदेशी (वय २१, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), कमलेश सुरेश पवार (वय २१, रा. सुमेरसिंग हॉटेलच्या बाजूला, कुसुंबा, ता. जि. जळगाव), रितेश निवृत्ती साळुंखे (वय २१, रा. दत्तमंदिराजवळ, कुसुंबा, ता. जि. जळगाव) अशा तिघांनी तपासात गुन्हा कबूल केला.
चौकट
चोरीचा मुद्देमाल जप्त
तिघांनी सांगितल्याप्रमाणे, ४० किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, जुन्या मोटारी व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.
-----