टुडे ३, मेन
----
NSK26H29034
जळगाव : जिल्हा व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हापरिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.
---------
प्रलंबित विकासकामांबाबत कालबद्ध कृति आराखड्याचे निर्देश
उपशीर्षक
पालकमंत्र्यांकडून झाडाझडती; पाळधी रेल्वे पूल, धरणगाव बायपास, रिंगरोडचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : जिल्ह्यासह जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंजूर विकासकामांना गती देण्यासह आगामी काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता.७) सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नगरपालिका तसेच शेतपाणंद रस्त्यांच्या कामांची कामनिहाय झाडाझडती घेतली.
मंजूर कामे तातडीने सुरू करून प्रगतीतील कामे पूर्णत्वाकडे न्यावीत, तर अद्याप सुरू न झालेली कामे तत्काळ मार्गी लावावीत, येत्या १५ दिवसांपासून महिनाभराच्या कालावधीत प्रत्येक कामात ठोस प्रगती दिसली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या योजना, कामांचा आढावा
अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी विशेष प्रकल्प, रस्ते व पूल, २५१५, नाविन्यपूर्ण योजना, आपत्ती व्यवस्थापन, आमदार निधी, गौण खनिज, सामाजिक न्याय, नाबार्ड, विशेष दुरुस्ती, वैशिष्ट्यपूर्ण योजना, ठक्कर बाप्पा, पर्यटन आदी विविध योजनांतील कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. अनेक कामांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेत अडचणींची कारणे विचारली.
-----
(चौकट)
धरणगाव बायपाससह
पुलांच्या कामांना गती
धरणगाव शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या जांभोरे–रेल्वे गेट–गणेश नगर–बी. आर. कॉलेज या सुमारे १५ किमी बायपासचा विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून त्यासाठी दीड ते दोन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बांभोरी–निमखेडी पुलाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंच्या ॲप्रोच रस्त्यांचे प्रस्तावही तातडीने शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले. म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या सुधारित ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या प्रकल्पाला गती देतानाच शेतकऱ्यांना सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगद्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
१४-२
पंचायत समिती इमारत
प्रस्तावाचे सादरीकरण
जळगाव पंचायत समितीच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा वास्तुविशारद पारगावकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांनी सविस्तर आढावा सादर केला. पालकमंत्री पाटील यांनी आवश्यक सुधारणा सुचवून सुमारे सात कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषदेची जुनी इमारत नव्याने बांधणे व दोन्ही इमारतींना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी वास्तुविशारद नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून डीपीआर तयार करावा, तसेच निधी मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
१४-१
यांची होती उपस्थिती
बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पवन सोनवणे, उपविभागीय अधिकारी, योगेश कुमार मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता सुहास सुपे, रोहयो अधिकारी मंजुषा घाडगे आदी उपस्थित होते.
------