पोलिस कुटूंबाच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था

पोलिस कुटूंबाच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था
Published on
NSK26H29035 जळगाव : गुणवंत पोलिस पाल्यांचा सत्कार करताना जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पतसंस्थेचे सभासद, पदाधिकारी. ----------- पोलिस कुटुंबांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था पोलिस अधीक्षक धिवरे : पोलिस कर्मचारी पतसंस्थेला १०६ वर्षे पूर्ण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : जिल्‍हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणारी आणि बचतीचा मंत्र देणाऱ्या पोलिस कर्मचारी पतसंस्थेला १०६ वर्षे पूर्ण झाली. पोलिस मुख्यालयात पद्मालय सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येऊन यावेळी सभासद, पोलिस कर्मचारी पाल्यांचा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षकांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून कर्मचारी कुटुंबीयांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. संस्थेने चालू आर्थिक (वर्ष २०२५-२६) वर्षात २ कोटी २ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. सभासदांना आजतागायत एकूण ७१ कोटींच्या जामीन कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. चौकट पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्ज योजना पोलिस पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी सवलतीच्या व्याजदराने आतापर्यंत सुमारे ८८ लाखांचे कर्ज तर वाहन खरेदीसाठी नऊ टक्के दराने ८७ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे. प्रत्येक सभासदाचा ३ वर्षांसाठी ५ लाखांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. तसेच, सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास तत्काळ आधार म्हणून दहा हजारांचा निधी दिला जातो.
Marathi News Esakal
www.esakal.com