दुष्काळ जाहीर करा

दुष्काळ जाहीर करा
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 29038 धुळे : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी. -- जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा -- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : जिल्ह्यात चालू वर्षात पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. - यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यातल्या त्यात जिल्ह्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरिपाची पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पाऊस झाला तरी ५० टक्केदेखील पिके हाती येणार नाहीत, अशी बिकट परिस्थिती ओढवली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेलाच आहे शिवाय जमिनीत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे रबी हंगामाची पिके घेणेही अशक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध योजनांच्या जाचक अटी शिथिल कराव्यात आणि वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री पाटील, शहराध्यक्ष नंदू येलमामे, साक्री तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, उपाध्यक्ष स्मिता खैरनार आदींनी निवेदन दिले. कासारे येथील उल्केश देसले, बाळा खैरनार, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com