धुळे : टुडे पान ३ साठी... अवतीभवती
--
गितेश पेटकरने
पटकावले सुवर्णपदक
धुळे : नंदुरबार जिल्हा वुशू संघटनेच्या मान्यतेने नंदुरबारस्थित एम.के.डी. स्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या आठव्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत दोंडाईचा येथील विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय येथील तृतीय वर्षाचा विद्यार्थी गितेश संजय पेटकर याने सीनियर गटात सुवर्णपदक पटकावले आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्याने हे यश संपादन केले. या यशाबद्दल स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, राज्याचे पणनमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, उपाध्यक्ष रवींद्र जमादार, सचिव सी. एन. राजपूत, सचिव प्रशासन ललितसिंह गिरासे, सहसचिव आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. एस. गिरासे, उपप्राचार्य प्रा. राहुल पाटील आदींनी कौतुक केले.
--
सरवडमध्ये भागवत
कथा ज्ञानयज्ञ
धुळे : कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर सरवड (ता. धुळे) येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू आहे. या धार्मिक सोहळ्याचे चौथे वर्ष असून गेल्या चार वर्षांपासून त्याचे अखंड आयोजन केले जात आहे. आमदार राम भदाणे यांनी जन्माष्टमीच्या दिवशी सोहळ्याला भेट दिली. त्यांनी वामन महाराज लामकानीकर यांची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतले. महाराजांच्या वाणीतून सुरू असलेल्या कथेचा आनंद यावेळी उपस्थितांनी घेतला. प्रभाकर युवराज पाटील, सुनील बोरसे, अशोक बोरसे, शशिकांत बोरसे, अरुण पाटील, भटू पाटील, गोकुळ पाटील, अरुण गिरधन पाटील, सुभाष पाटील आणि राजेंद्र गंभीर पाटील यांच्यासह ग्रामस्थ संयोजन करत आहेत.