महिलांना शिलाई मशीन वाटप

महिलांना शिलाई मशीन वाटप
Published on
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो-NSK26H29043 धुळे : सूर्योदय फाउंडेशनतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करतांना आमदार अनुप अग्रवाल. शेजारी मायादेवी परदेशी, कल्याणी अंपळकर, गजेंद्र अंपळकर व इतर मान्यवर व फाउंडेशनचे पदाधिकारी. --- महिलांनी कौशल्याच्या बळावर आत्मनिर्भर व्हावे --- आमदार अनुप अग्रवाल; सूर्योदय फाउंडेशनतर्फे ४०० महिलांना शिलाई मशीन वितरित सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांच्या हाताला कौशल्य देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे ही काळाची गरज आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांनी घरबसल्या व्यवसाय सुरू करून स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग निर्माण करावा. मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत महिलांनी कुटुंबाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील पहिल्या उपक्रमासाठी धुळे जिल्ह्याची निवड करून धुळे ग्रामीण भागातील ४०० गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. हिरे भवन येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अग्रवाल प्रमुख पाहुणे होते. महापौर मायादेवी महादेव परदेशी, नगरसेविका कल्याणी अंपळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आकाश परदेशी, भाजपचे कोषाध्यक्ष राम अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी उपस्थित होते. यावेळी आमदार अग्रवाल म्हणाले की, महिलांच्या हातात कौशल्य असेल तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. एका महिलेला आत्मनिर्भर केल्यास त्याचा फायदा केवळ त्या महिलेलाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला होतो. त्यामुळे महिलांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून शिलाई व्यवसाय सुरू करावा. घरातूनच रोजगार निर्माण करून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याबरोबरच भविष्यात इतर महिलांनाही रोजगार देण्याची क्षमता निर्माण करावी. शासनाच्या विविध योजना तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. सक्षमीकरणासाठी उपक्रम सूर्योदय फाउंडेशन ही सामाजिक व जनकल्याणकारी संस्था असून समाजातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविते. महिलांना केवळ शिलाई मशीनचे वाटप करणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून त्यांच्या हाताला कौशल्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. ‘हर हाथ को हुनर, हर हुनर को रोजगार और हर परिवार को आत्मनिर्भर बनाना’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष घनश्याम द्विवेदी व सचिव धीरेंद्रकुमार राय यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व मानव विकास फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज बडगे व उपाध्यक्ष सीमा बडगे यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com