पान-२ टुडेसाठी ॲंकर करणे
-----------
NSK26H29051
नाशिकमधील मुलाखतीप्रसंगी आशाताईंसह जगदीश कुलकर्णी.
---------------
३६-४
दिल अभी भरा नही!!
-----------
लीड
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज (ता.८ सप्टेंबर) ९३ वा वाढदिवस आहे. आशाताई कार्यक्रमानिमित्त अनेकदा नाशिकमध्ये येत असत. त्यांच्या नाशिकमधील काही आठवणीविषयी....
----------
ना शिकमधली आशाताईंची विशेष संस्मरणीय आठवण आहे. १९९७ च्या नाशिकच्या नाट्यसंमेलनाची. रात्री उशिरा आशाताईंचा कार्यक्रम होता. जानेवारीचा महिना, कडाक्याची थंडी आणि नाशिकला काय झाले देव जाणे... अचानक वादळ सुरू झालं. पहिली काही गाणी झाली आणि चक्क धो धो पाऊस सुरू झाला. कार्यक्रम पुढे सरकणं अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम त्याच उत्साहात सुरू झाला आणि या वेळेला मात्र पावसाने कृपा केली आणि भालेकर मैदान धन्य झालं.
पुढे मला वाटतं २००९ मध्ये डोंगरे मैदानावर एप्रिल महिन्यात कार्यक्रम झाला... तेव्हाही सेम स्टोरी. त्यादिवशी मात्र पावसाने खूप मोठा कहर केला. लोकांनी अक्षरशः त्या प्लास्टिकच्या खुर्च्या डोक्यावर धरल्या. या दृश्याची अनेक वृत्तपत्रात आलेली छायाचित्रेदेखील मला आठवतात. सुधीर गाडगीळ यांनी त्यावर कॉमेंट केली, कि या भागात एखाद्या ठिकाणी पाऊस पडला नाही, तर तिथे आशाताईंचा कार्यक्रम ठेवायला हरकत नाही.
डि. लिट. पदवी निमित्ताने आशाताई नाशिकमध्ये आल्या होत्या, तेव्हा दूरदर्शनसाठी मी मुलाखत घ्यायला गेलो होतो. ताज हॉटेलच्या जिन्यावरून, भरजरी, मंद पिस्ता रंगाच्या साडीमध्ये आशाताई, आपल्या सहाय्यिकेसह खाली आल्या. गळ्यामध्ये मोत्याची माळ आणि हातामध्ये नक्षीदार तोडा. आशाताई एखाद्या सम्राज्ञीसारख्या अवतरल्या. हॉटेलच्या गॅलरीमध्ये त्या गेल्या आणि म्हणाल्या, मला ही जागा फार आवडते. खर तर या ठिकाणी नेहमी खूप पोपट येतात, पण आज मात्र दिसत नाहीयेत.
मी थोड्याशा हळू आवाजात बोललो ''कदाचित आज ''कोकिळा'' आल्यामुळे पोपट आले नसतील.''
आशाताई लगेच मिश्किलपणे म्हणाल्या,‘ माझ्या रंगामुळे तुम्ही हे म्हणताय का?’
आपल्या आवाजामुळे आमच्या आयुष्यात अनंत रंग भरणाऱ्या आशाताई स्वतःच्या रंगाविषयी इतकी सहज कॉमेंट करू शकतात. खाली वाकून मी आणि आम्ही सर्वांनीच ताईंच्या पायाला स्पर्श केला. ताजच्या रिसेप्शनमध्ये शूटिंग झाले, बऱ्याच गप्पा झाल्या. नाशिकच्या आठवणी निघाल्या, निघताना छायाचित्र काढले तेव्हा आशाताई म्हणाल्या,‘ आता मला डि. लीट. मिळणार, म्हणजे मी आता ''डॉक्टर आशा भोसले'' आहे. आशाताई, आमचं अख्खं आयुष्य दैवी आवाजाने तुम्ही ''निरामय'' केलंत. तुमचे सूर अजूनही आम्हाला तसेच हवे आहेत..
आमचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर इतकेच म्हणतो, की ''दिल अभी भरा नही’!
--------------
- जगदीश कुलकर्णी
फिल्म निर्माता, दिग्दर्शक (माजी व्हिडिओ इंजिनियर, मुक्त विद्यापीठ)