धुळे ः टुडे २ साठी
--
चार कॉलमात / फोटो क्रमांक ः 29060
धुळे : आनंद रेसिडेन्सीत ‘सकाळ- तनिष्का’ व्यासपीठातर्फे झालेल्या ‘श्रावण सरी’ कार्यक्रमात सहभागी महिला.
--
धुळ्यातील महिला ‘श्रावण सरी’त चिंब
--
‘सकाळ- तनिष्का’ व्यासपीठ : विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का महिला व्यासपीठातर्फे झालेल्या ‘श्रावण सरी’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. या सोहळ्याने महिलांना आपली कला, कौशल्य आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी एक आनंददायी व प्रेरणादायी दालन खुले केले, ज्याचे उपस्थितांनी मुक्त कंठाने कौतुक केले.
-
‘श्रावण सरी’ सोलो डान्स, ग्रुप डान्स, उखाणे, पाककला, मेहंदी, गायन, वक्तृत्व, नाटक, मंगळागौर, भजन आणि भारुड अशा विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दोंडाईचास्थित हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, शिरपूरच्या उपनगराध्यक्ष संगीता देवरे, माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर, जिल्हा माहेश्वरी समाज संघटनमंत्री मीनाक्षी राठी, चावरा स्कूलच्या शिक्षिका मोहिनी ढोबळे- पाटील, चंदूकाका सराफ ज्वेलर्सच्या प्रियांका त्रिवेदी, सोनी पैठणीच्या कीर्ती सोनी, कोमल सोनी, मिस नाशिक निशा अरोरा, माजी नगरसेविका आरती पवार, डॉली हाऊसच्या संचालिका हेमलता जैन प्रमुख पाहुण्या होत्या.
-
कलात्मकतेचे दर्शन
सोलो डान्समध्ये राशी साने, आकाशा वर्मा आणि रंजना ठाकूर यांनी सहभाग घेतला. ग्रुप डान्समध्ये नीलिमा सनेर, जयश्री-कोमल-वेदिका ग्रुप तसेच रूपाली माळी ग्रुपने सादरीकरण केले. उखाणे स्पर्धेत संगीता पाटील, माया डोलार आणि सुलभा ईशी यांनी आपल्या उखाण्यांनी लक्ष वेधले. पाककला स्पर्धेत निकिता अग्रवाल, दीपाली बोरसे आणि शबाना शेख यांनी सहभाग नोंदविला. मेहंदी स्पर्धेत निकिता अग्रवाल आणि मोहिनी माळी यांनी कलात्मकतेचे दर्शन घडविले. गायन स्पर्धेत किरण बच्छाव, यशस्विनी जाधव आणि नीलिमा थोरात यांनी गीते सादर केली. वक्तृत्व स्पर्धेत जया साळुंखे, रूपाली मराठे आणि प्रतिमा गायकवाड यांनी आपले विचार मांडले. नाटकामध्ये निर्मिती वैद्य आणि डॉ. शुभांगी एडिस यांनी रंगतदार सादरीकरण केले. मंगळागौर स्पर्धेतील तीन गटांमध्ये रूपाली पराडके, हर्षा कुलकर्णी आणि वैष्णवी वाणी यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले. उर्मिला राजपूत ग्रुपने पारंपरिक भजन सादर केले, तर रत्ना पाटील यांनी भारुडाच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळविली. माजी नगरसेविका आरती पवार यांनी सूत्रसंचालन केले.