सटाणा वर्धापनदिन-- मालेगाव टुडे पान २ साठी लेख
--------------
फहीम शेख ः NSK26H29244
---------------
तीन पिढ्यांचा लोकसेवेचा वारसा; शिक्षण, सहकार आणि सामाजिक सलोख्याची अनोखी वाटचाल
-------------
सार्वजनिक जीवनात आपले कार्य, माणुसकीचे नाते आणि समाजासाठी केलेल्या योगदानातून वाटचाल अधिक दृढ होत जाते. फहीम शेख कुटुंबाचा प्रवास याचेच एक उदाहरण आहे. तीन पिढ्यांनी नगरसेवकपदाच्या माध्यमातून लोकांचे प्रतिनिधित्व केले. व्यवसाय, सहकार आणि सामाजिक सलोखा या क्षेत्रांतही या कुटुंबाने आपला ठसा उमटविला.
---------------
लोकसेवेच्या परंपरेची सुरुवात बशीर उख्खन शेख यांच्यापासून झाली. १९६८ ते १९७३ या काळात ते उपनगराध्यक्ष झाले. शेतीशी नाते जोडत त्यांनी उत्कृष्ट शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. ट्रक व्यवसायानिमित्त त्यांचा विविध गावांशी निर्माण झालेला संपर्क पुढे सामाजिक नात्यांत रूपांतरित झाला. चौकटीपलीकडे माणसांशी जुळणारे संबंध हीच पुढे शेख कुटुंबाच्या सामाजिक वाटचालीची मोठी ताकद ठरली. यानंतर शबाना शेख या नगरसेविका तसेच बांधकाम, महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी काम केले. या परंपरेची तिसरी पिढी २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुमेरा यासीर शेख यांच्या नगरसेविकारुपाने दाखल झाली.
या कुटुंबाचा वारसा केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिला नाही. अल्पसंख्याक समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने फहिम शेख यांनी १९८४ मध्ये उर्दू माध्यमाची माध्यमिक शाळा सुरू केली. पहिली ते दहावीपर्यंतच्या या शाळेने काळानुरूप आधुनिक रूप धारण केले आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी या उपक्रमाचा मोठा हातभार लागला. फहिमदादांच्या व्यक्तिमत्त्वाला क्रीडा क्षेत्राचीही किनार आहे. त्यांचे कबड्डी क्षेत्रात जिल्ह्यात नाव आहे, पुढे जिमखाना अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. अल्पसंख्याक समाजातील तरुण-तरुणींना व्यवसायासाठी आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने २००१ मध्ये त्यांनी बागलाण नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. अनेकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न झाला.
---------------
सामाजिक सलोखा हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. आर. आर. पाटील प्रतिष्ठान तसेच रिगलदेवा सार्वजनिक वाचनालयाचे ते विश्वस्त आहेत. २००१ पासून ते सातत्याने शिवजयंती साजरी करीत आहेत. अल्पसंख्याक समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील नाते सामाजिक एकोप्याच्या माध्यमातून अधोरेखित करत त्यांनी सलोख्याचा आदर्श निर्माण केला. त्यांचे मोठे पुत्र यासीर शेख हे कांदा व्यवसायात तर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी हुमेरा या कायद्याच्या पदवीधर असून २०२५ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. दुसरे पुत्र बुझेर शेख हे कायद्याचे पदवीधर असून मुंबईत वकिली करतात. त्यांच्या पत्नी आयशा या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. राजकीय क्षेत्रातही फहिम शेख यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी विश्वासाचे संबंध राहिले आहेत. पदे बदलली, काळ बदलला, व्यवसायाचे स्वरूप बदलले; मात्र माणसांशी जोडलेले नाते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड कायम राहिली.