राजेंद्र सोनवणे ः सटाणा

राजेंद्र सोनवणे ः सटाणा
Published on
सटाणा वर्धापनदिन --------------- राजेंद्र सोनवणे ः सटाणा NSK26H29075 ------------ चळवळीतून घडलेले नेतृत्व; अन माणसे जोडणारी ताकद ----------------- राजकारणात कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर, प्रखर राजकीय इच्छाशक्तीवर, दांडगा जनसंपर्क, संघटनकौशल्य आणि सामाजिक बांधिलकीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे राजेंद्र यशवंत सोनवणे हे माणसे जोडण्याची ताकद असलेले आगळेवेगळे व्यक्तिमत्व. ‘रिगल देवा’ अर्थात ‘राजू दादा’ या नावाने सटाणा शहरात परिचित असलेले ते केवळ राजकीय पदाधिकारी नाहीत, तर चळवळीतून घडलेले, सामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने मैदानात उतरणारे नेतृत्व म्हणून बागलाणच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून आहेत. ----------------- प्रतिनिधी ----------- वि द्यार्थीदशेपासूनच मोठा मित्रपरिवार असलेल्या सोनवणे यांनी सुमारे ३५ वर्षांपूर्वी सटाणा शहरात स्वतःच्या घरातून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रेडियम प्लेट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. वयाच्या तिसाव्या वर्षी ते सटाण्यात नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाची दारे खुली झाली. कोणत्याही राजकीय वारशाचा आधार नसताना स्वकर्तृत्वावर त्यांनी बागलाणच्या राजकीय पटलावर आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली. शहरवासियांनी त्यांना सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष तसेच युवक काँग्रेसच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. ल हानपणीच मातृछत्र आणि बंधूछत्र हरपल्यानंतरही राजू दादा प्रतिकूल परिस्थितीसमोर कधी डगमगले नाहीत. त्यांचे वडील स्वर्गीय यशवंत माधवराव सोनवणे हे जिल्हा बँकेतील आदर्श शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले. मात्र नोकरीचा पारंपरिक मार्ग न स्वीकारता राजेंद्र सोनवणे यांनी सामाजिक कार्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले. २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या नावाने ‘रिगल देवा सार्वजनिक वाचनालय’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून त्यांनी वाचन आणि समाजप्रबोधनाची चळवळ सुरू केली. विवाहानंतर पत्नी अर्चना यांनी वाचनालयाची जबाबदारी सांभाळली, एकुलती एक मुलगी रेवश्री ही कॉम्प्युटर (एआय) पदवी चे शिक्षण घेत असले तरी दादांच्या राजकीय वाटचालीत तिचाही मोठा हातभार आहेत म्हणूनच राजूदादा स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामासाठी झोकून देत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सोनवणे यांच्या कार्यात समाजप्रबोधनाला कायम महत्त्वाचे स्थान राहिले. जागतिक महिला दिन, पर्यावरण दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन, साक्षरता अभियान, सर्वरोग निदान शिबिरे, वाहतूक सुरक्षा सप्ताह, सद्भावना रॅली, ग्रामस्वच्छता अभियान, निबंध स्पर्धा, करिअर संवाद, पर्यावरण रॅली, मृद व जलसंधारण जनजागृती, शैक्षणिक साहित्य वाटप, हस्तकला प्रदर्शन, साक्षरता अभियान, वृक्षारोपण आणि कॅन्डल मार्च अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे, रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षांना राखी बांधणे, होळीच्या वेळी कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करणे, शहरात वृक्षसंरक्षक जाळ्यांचे वाटप करून वृक्षलागवडीला प्रोत्साहन देणे, सेवाभावी संस्थांना लागवडीसाठी वृक्षरोपे भेट देणे अशा अभिनव उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली. समाजातील दुर्लक्षित घटकांतील तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे कामही त्यांनी केले. राजकीय क्षेत्रातही सोनवणे यांनी संपर्काचे रूपांतर जनसेवेत करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार, मंत्री छगनराव भुजबळ, स्वर्गीय आर. आर. पाटील, हसन मुश्रीफ, खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांच्याशी असलेल्या जवळिकीचा उपयोग त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. मोठ्या नेत्यांशी असलेला संपर्क हा केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी न ठेवता तो जनतेच्या कामी कसा येईल, याला त्यांनी अधिक महत्त्व दिले. २०२२ मध्ये अजितदादा पवार यांनी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजेंद्र सोनवणे यांच्यावर सोपविली. या विश्वासाला सार्थ ठरवीत त्यांनी तालुक्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्याबरोबरच सामाजिक उपक्रम आणि जनप्रश्नांवरील आंदोलनांची सांगड त्यांनी घातली. सामाजिक प्रश्नांसाठी रास्ता रोको, मूक मोर्चा, साखळी उपोषण, गांधीगिरी आंदोलन अशा विविध मार्गांचा अवलंब करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे, आवश्यक तेथे प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणे, ही त्यांची कार्यशैली आहे. त्यामुळे वैचारिक आंदोलनातून संपूर्ण शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेणारा कार्यकर्ता अशीही त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. समाजसेवक बाबा आमटे, साधनाताई आमटे, अण्णा हजारे, भारतरत्न रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, त्यांचे गुरू रमाकांत आचरेकर, दिलीप वेंगसरकर आणि लालचंद राजपूत यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहवास लाभल्याचा उल्लेख सोनवणे नेहमी करतात. या व्यक्तिमत्त्वांकडून मिळालेली प्रेरणा ही आपल्या सामाजिक प्रवासातील मोठी शिदोरी असल्याची भावना ते व्यक्त करतात. त्यांची एकुलती एक कन्या रेवश्री सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक विषयातील पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. ‘आपल्याकडे किती मोठे पद आहे, यापेक्षा एक सामान्य माणूस म्हणून आपण किती लोकांच्या उपयोगी पडू शकतो,’ हीच राजेंद्र सोनवणे यांच्या कार्याची मध्यवर्ती भूमिका आहे. जनतेला वारंवार भेडसावणाऱ्या प्रश्नातून मुक्त करण्यासाठी आपले सर्व कौशल्य पणाला लावणे, प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि यश मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणे, हा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा स्थायीभाव राहिला आहे. राजकारणात पदे येतात-जातात; मात्र माणसांशी निर्माण झालेले नाते आणि समाजासाठी केलेले काम दीर्घकाळ टिकते, यावर राजेंद्र सोनवणे यांचा विश्वास आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास केवळ नगरसेवकापासून तालुकाध्यक्षापर्यंतचा राजकीय प्रवास नाही, तर एका सामान्य कार्यकर्त्याने जनसंपर्क, संघटनशक्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघर्षाच्या जोरावर उभे केलेल्या नेतृत्वाचा प्रवास आहे. बागलाणच्या राजकीय आणि सामाजिक पटावर ‘राजू दादा’ हे नाव आज माणसे जोडणाऱ्या आणि प्रश्नांसाठी लढणाऱ्या स्वतंत्र कार्यशैलीचे प्रतीक ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com