बॅटरी कारखाना फोडणारे सहा चोरटे अटकेत

बॅटरी कारखाना फोडणारे सहा चोरटे अटकेत
Published on
NSK26H29067 जळगाव : कारखान्यातून चोरट्यांनी लंपास केलेल्या शिशाच्या विटा जप्त करणाऱ्या पोलिस पथकासह निरीक्षक बबन आव्हाड. ---- बॅटरी कारखाना फोडणारे सहा अटकेत --- जळगावातील घटना; टोळीकडून लाखाच्या शिशाच्या विटा जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील आनंद बॅटरी कारखाना फोडून चोरट्यांनी शिशाच्या विटा लंपास केल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करीत सहा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३९० किलो वजनाच्या शिशाच्या विटांसह गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे. औद्योगीक वसाहतीतील लखन वासुदेव बुधानी (रा. कंवरनगर) यांच्या श्री आनंद बॅटरी कारखान्याच्या कंपाऊंडची जाळी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी शिशाच्या धातूच्या २० विटा चोरून नेल्या. या विटांचे वजन ५०० किलो असून, किंमत सुमारे एक लाख २५ हजार रुपये आहे. बुधानी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सात दिवसांत तपास पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष घालून पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि गुन्हेशोध पथकाचे स्वतंत्र पथक तयार केले. चौकट चोरीचा माल जप्त तपासादरम्यान पोलिसांनी आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश ऊर्फ बापू संतोष भोई, मुकेश राजू परमार, शेख आबिद शेख मोहंमद आणि शकील शहा रुबाब शहा यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली, तसेच दडवून ठेवलेल्या शिशाच्या १६ विटा (३९० किलो) व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी काढून दिली. उर्वरित मुद्देमालाबाबतही तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com