पंचवटी पोलिस घेणार कुख्यात शेखर निकमचा ताबा

पंचवटी पोलिस घेणार कुख्यात शेखर निकमचा ताबा
Published on
सेकंड मेन -- पंचवटी पोलिस घेणार कुख्यात शेखर निकमचा ताबा गोळीबार प्रकरण; माजी नगरसेवक जगदीश पाटीलच्या अडचणीत वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंचवटीतील फुलेनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने अमरावती कारागृहात शिक्षाबंदी असलेला कुख्यात शेखर निकम यास पंचवटी पोलिस ताब्यात घेणार आहे. गृहविभागाने त्यास मंजुरी दिली असून, लवकरच त्याचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, यामुळे सदर गुन्ह्यातील संशयित व भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंचवटीतील फुलेनगरमध्ये गोळीबार झाला असता, याप्रकरणी १७ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार शेखर राहुल निकम याची शिक्षा स्थगित करून ५ दिवसांसाठी ताब्यात देण्याची मागणी पंचवटी पोलिसांनी आयुक्तालयामार्फत केली होती. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा, पुणे) यांच्या अभिप्रायानंतर गृह विभागाने निकम या शिक्षाबंदीची शिक्षा त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतल्याच्या तारखेपासून तपासाच्या आवश्यकतेनुसार ५ दिवसांसाठी स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्याकडे सदर शिक्षाबंदीचा ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यास पुन्हा अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. --चौकट असा आहे प्रकार... निकम टोळीच्या म्होरक्या व मयत किरण निकमचा भाऊ शेखर निकम हा सध्या अमरावती कारागृहात आहे. १० सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात शेखर निकमला हजर केले जाणार होते. त्यासाठी अमरावती आयुक्तालयाचे तीन कर्मचारी शेखर निकम यास ९ सप्टेंबर रोजी नाशिकला घेऊन आले. कायदेशीररीत्या निकम यास पोलिस कोठडीत ठेवणे आवश्‍यक असताना अमरावती पोलिसांनी निकमसह नाशिक रोड परिसरातील लॉजमध्ये मुक्काम केला. त्याचवेळी निकम टोळीच्या संशयितांसह माजी नगरसेवक जगदीश पाटीलने कैदी निकम याची त्या लॉजमध्ये भेट घेतली होती. त्यांची बैठक झाली होती. त्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज नाशिक पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार, माजी नगरसेवक पाटीलला अटक केली होती. .... पाटील पाच महिने कारावासात १७ सप्टेंबर २०२५ रोजी फुलेनगरमध्ये सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला होता. निकम-उघडे टोळीच्या वादातून  गोळीबार करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील यानेच सराईत गुन्हेगार व सध्या अमरावती कारागृहात असलेल्या शेखर निकम याच्याशी संगनमत करीत जाधववर गोळीबार करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने त्यांना २१ सप्टेंबर २०२५ रोजी पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. पाच महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची जामीनावर सुटका झाली. मात्र निकमला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com