शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञता सन्मान

शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञता सन्मान
Published on
पान चार सेकंड मेन -------------- २९०७० नाशिक : गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कृतज्ञता सन्मान प्रसंगी नानासाहेब बोरस्ते, प्र द कुलकर्णी व इतर वृत्तपत्र विक्रेते समाजाचे सोबती : बोरस्ते शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञता सन्मान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेते लोकांची सकाळ प्रसन्न करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगण्याचा संदेश देणारे वृत्तपत्र विक्रेते केवळ व्यावसायिक नसून समाजाचे खरे सोबती असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हुतात्मा स्मारकात कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सावळीराम तिदमे होते. या वेळी नाशिक रोड, नवीन नाशिक, मध्य नाशिक, सातपूर आदी भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र. द. कुलकर्णी, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, नाशिक मध्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नवीन नाशिक वृत्तपत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी ठाकरे, सातपूर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विक्रेत्यांनी आपल्या मनोगतात सामाजिक जडणघडणीत वृत्तपत्रांचे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान पुस्तकावर बोलू काही उपक्रमाचे ३०० वे पुष्प सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी ‘पुस्तकानुभव’ पुस्तकावर गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. जी. वाघ होते. प्रशांत कापसे आणि राजेंद्र अहिरराव यांना ग्रंथ भेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी प्रास्ताविक, अशोक कुमावत यांनी सूत्रसंचालन तर मधुकर गिरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com