धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी मुख्यमंत्र्यांना धनगर समाज महासंघाचे निवेदन

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी
मुख्यमंत्र्यांना धनगर समाज महासंघाचे निवेदन
Published on
NSK26H29037 जळगाव : धनगर समाजातर्फे विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलेले पदाधिकारी. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी ठोस भूमिका घ्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाज महासंघाचे निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी शासनाने कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, धनगर समाज कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात धनगर समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असून, आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न केवळ राजकीय आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात शासनाने ठाम व प्रभावी भूमिका मांडावी. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरील आवश्यक कार्यवाही गतिमान करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नको सध्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या आदिवासी बांधवांच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्काला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवावा, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासनाने धनगर समाजाच्या मागणीबाबत शासनाकडे सकारात्मक व तातडीचा अहवाल पाठवावा आणि आरक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चौकट अन्य मागण्या धनगर समाजाच्या निवेदनात हुतात्मा वीर शिक्रोबा धनगर यांच्या नावाने कनेक्टिंग लिंकचे नामकरण करावे, चर्चगेट रेल्वेस्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशा मागण्यांचाही समावेश आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना तुळशीराम सोनवणे यांच्यासह दीपक धनगर, मंजू सूर्यवंशी, डिगंबर सोनकीर, प्रमित कखरे, संतोष होतिक, दीपक आस्कर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com