बी.जे.मार्केटसमोर चिकन विक्रेत्यावर कोत्याने हल्ला

बी.जे.मार्केटसमोर चिकन विक्रेत्यावर कोत्याने हल्ला
Published on
मांसविक्रेत्यावर कोत्याने हल्ला --- गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील भिकमचंद जैन व्यापारी (मार्केट) संकुलासमोरील मांस विक्रेत्यावर कोत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. गोपाळ मधुकर चौधरी असे जखमींचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमीच्या पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जैन व्यापारी संकुलासमोर मांस विक्रीची हातगाडी चालवून गोपाळ उदनिर्वाह करतात. त्यांच्याच रांगेत पुतण्या सचिन सुनील चौधरी (वय २१, रा. कासमवाडी) गाडी लावून मांस विक्री करतो. त्यांचे काका गोपाळ मधुकर चौधरी यांनी संशयित सुनील रसाळ राठोड (कांचननगर) याच्याविरुद्ध यापूर्वी येथील औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचा व जुन्या वादाचा राग मनात ठेवून सुनील राठोडने बदला घेण्याच्या उद्देशाने बेसवाध असलेल्या गोपाळ चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अचानक गोंधळ, आरडाओरड व काकांच्या आरोळ्या ऐकू आल्याने सचिन याने धाव घेतली, तर संशयित सुनील राठोड त्यांच्यावर कोयत्याने वार करीत होता. सुनीलने वेळीच मध्यस्थी करून काकाचा जीव वाचविला. गर्दी एकवटल्याने संशयिताने घटास्थळावरून पळ काढला. हल्ल्यानंतर जखमी गोपाळ चौधरी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व त्यानंतर न्यूरोलॉस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com