धार्मिक व सेवाभावी आश्रमांना हवे ५० लाख

धार्मिक व सेवाभावी आश्रमांना हवे ५० लाख
Published on
धार्मिक, सेवाभावी आश्रमांना हवे ५० लाख ८४ संस्थांची ऑनलाइन नोंदणी; मंजूर निधी १५ लाख, प्रस्ताव ३० लाखांचे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांनंतर आता धार्मिक व सेवाभावी आश्रमांमध्येही पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येकी ५० लाखांची मागणी केली आहे. मात्र, त्यांना १५ लाखांची घोषणा झालेली असली तरी त्यांनी प्रस्ताव मात्र ३० लाखांचे दिले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या भागातील आश्रमांमध्येही पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नोंदणीकृत आश्रमांना नावनोंदणीसाठी आवाहन केल्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ८४ आश्रमांनी नोंदणी करून त्यांच्या आश्रमासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व त्यासाठी अपेक्षित निधीची मागणी केली आहे. त्यानुसार या आश्रमांना प्रत्येकी १५ लाख रुपयांप्रमाणे साधारणतः १२ कोटी रुपये निधीची आवश्यकता भासणार आहे. गेल्या कुंभमेळ्यात १५ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे गेल्या १२ वर्षांत यात वाढ व्हायला हवी, अशी मागणी आखाड्याच्या साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार ३० लाखांपर्यंत निधी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. यादृष्टीने त्यांनी कुंभमेळा प्राधिकरणाकडे कामे सुचविली आहेत. त्यात प्रामुख्याने कायमस्वरूपी शेड, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्वच्छतागृह या कामांचा समावेश असतो. नोंदणी झालेल्या ८४ पैकी तब्बल ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यात नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वरमधील २० संस्थांचा यात समावेश आहे. तर उर्वरित १३ संस्था बाहेरील आहेत. --- कोट आखाड्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना पुरेसा निधी मिळाला. पण धार्मिक संस्थांच्या निधी ३० लाख रुपये मिळाला पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. - महंत शंकरानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद --- ठळक बाबी - सिंहस्थासाठी ८४ धार्मिक आणि सेवाभावी संस्थांनी ऑनलाइन नोंदणी केली - पात्र संस्थांना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंत पायाभूत सुविधा देण्याचा निर्णय - कमाल मर्यादेनुसार ८४ संस्थांसाठी १२ कोटी ६० लाख रुपयांची आवश्यकता - ३१ संस्थांनी पाच कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या सुविधांची मागणी केली - अर्ज आणि मागण्यांची प्रत्यक्ष पडताळणी सुरू - नाशिक जिल्ह्यातील ७१ आणि जिल्ह्याबाहेरील १३ संस्थांची नोंदणी - नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वरमधील २० संस्थांचा समावेश - क्यूआर कोडआधारित प्रणालीद्वारे १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले - नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आश्रमांच्या निवडीची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणांकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com