रिक्षाच्या धडकेत सायलस्वाराचा मृत्यू

रिक्षाच्या धडकेत सायलस्वाराचा मृत्यू
Published on
पान तीन दोन कॉलम ------------ रिक्षाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू कुटुंबियांची महापालिकेकडे मदतीची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.७ : त्र्यंबकेश्‍वर रोडवरील एबीबी सर्कल येथे भरधाव रिक्षा चालकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सायलकस्वाराचा मृत्यू झाला. चंद्रकांत लक्ष्मण सूर्यवंशी (रा.सातपूर) या मृत व्यक्तीचे नाव आहे. २५ जून रोजी घडलेल्या या घटनेमुळे सूर्यवंशी कुटुंब आता उघड्यावर आले असून मृत चंद्रकांत यांच्या पत्नी कविता सूर्यवंशी यांनी महापालिकेकडे मदतीसाठी अर्ज केला आहे. त्र्यंबकेश्‍वर रोडवरील एबीबी सर्कलपासून वाहतूक वळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे येणारी व जाणारी वाहतूक एकाच बाजूने सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. २५ जूनला चंद्रकांत सूर्यवंशी हे कॉसमॉस बँक येथे सुरक्षारक्षक म्हणून कामावर जात असताना सकाळी सातला रिक्षाने धडक दिली. यात सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. अगोदर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सिटी स्कॅन मशीन नसल्यामुळे आडगाव येथील मविप्र रुग्णालयात व नंतर औषधोपचारासाठी पैसे नसल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र २८ जून २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कामामुळेच आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे कविता सूर्यवंशी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. तरी महापालिकेने त्यांना आर्थिक भरपाई द्यावी. जेणेकरुन मुलांचे शिक्षण, वृद्ध सासू-सासरे यांची देखभाल व दोन कन्यांच्या विवाहाची जबाबदारी पार पाडता येईल. सूर्यवंशी कुटुंबाची उपासमार होत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com