NSK26H29086
जळगाव : न्यायमूर्ती देशमुख यांना निवेदन देताना वकिलांचे शिष्टमंडळ.
-----
जळगावात खंडपीठ व्हावे; वकिलांची मागणी
न्यायमूर्ती देशमुख यांना वकिल शिष्टमंडळाचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : येथे मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट खंडपीठ’ मंजूर करण्याच्या मागणीसाठी जळगावातील वकील व बार कौन्सिलच्या प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांची जिल्हा न्यायालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी न्यायमूर्ती देशमुख यांना विशेष निवेदन सादर केले. यावेळी खंडपीठाच्या मागणीवर चर्चा झाली.
या प्रसंगी ॲड. संजयसिंग पाटील जळगाव बार असोसिएशचे अध्यक्ष ॲड दर्शन देशमुख, सचिव ॲड आशिष पाटील, उपाध्यक्ष ॲड राजेश गवई, ॲड. सचिन चव्हाण, ॲड. अर्जुन पाटील, ॲड. संजय सपकाळे, ॲड. श्रीराम बारी, ॲड. प्रवीण शिंदे तसेच सर्व वरिष्ठ व कनिष्ठ इतर मान्यवर वकील उपस्थित होते. यासाठी गोवा व महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष भरत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेश जोशी उपस्थित होते. न्यायालयाच्या ग्रंथालयात झालेल्या बैठकीत ॲड. संजयसिंग पाटील यांनी निवेदन देताना जळगावात उच्च न्यायालय आवश्यक असल्याबाबत प्रभावी म्हणणे मांडले. त्यावर जळगावचे पालक न्यायमूर्ती श्री. देशमुख यांनी सकारात्मकता दर्शविली.