लोगो
----
डॉक्टर घडवणारी जरीवाला शाहीन ॲकॅडमी
-----------------
लेखक : जलील शेख - photo
सात वर्षापूर्वी सुरु झालेली जरीवाला शाहीन ॲकॅडमीच्या दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना नेण्याचे यशाचे नेत्रदीप मार्ग सुरु आहे. २०२६ मध्ये ॲकॅडमीचा चांगला निकाल लागला. यात देशातून ७५९ नंबर मिळवत येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्या पाठोपाठ ६६ विद्यार्थ्यांनी ४९० ते ६२४ पर्यंत गुण मिळवून मोठे यश संपादन केले आहे. यामागे शाहीन ॲकॅडमीचे संचालक मेहफूज रहमान जरीवाला यांचे परिश्रम आहेत. एकंदरीत जरीवाला शाहीन ॲकॅडमीतून डॉक्टर घडविण्याचे काम करीत आहे. शहरातील सर्वात मोठे शैक्षणिक कॅम्पस म्हणजे अंजुमन मोईनुत तुलबा आहे. संस्थेची सुरुवात १९५३ मध्ये मोहम्मद इस्हाक शेठ जरीवाला यांनी केली आहे.
शहरात यंत्रमागाचा मुख्य व्यवसाय असून गरिबांची मुले डॉक्टर व्हावीत. मालेगावातच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत हा त्यांचा उद्देश होता. त्या अनुषंगाने त्यांनी २०१८ मध्ये शाहीन ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल कादीर जरीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावला शाहीन जरीवाला ॲकॅडमीची सुरुवात झाली. सुरुवातीला एक हजार विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविला. आठ वर्षात सुमारे ८ ते ९ हजार विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. यातील काही डॉक्टरही झाले आहेत.
या ॲकॅडमीमुळे मालेगाव शहराचे नावलौकिक वाढला आहे. डॉक्टर घडविणारी ॲकॅडमी म्हणून जरीवाला शाहीन ॲकॅडमीकडे बघितले जाते. येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न देखील पुर्ण होत आहे. त्याचबरोबर मालेगाव हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जियाऊर रहेमान जरीवाला हे देखील येथे विविध प्रकारचे शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाकडे त्यांचा भर आहे. यंदा नीटचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात देशपातळीवरून सी रँकमधून अरीब अश्मीर निसार अहमद यांनी ६४१ गुण मिळविले आहे. त्यापाठोपाठ मोहम्मद जैद, उम्रेन अब्दुल्ला, खान जिकरा, बझेगा अन्सारी, मारिया जिआउर रहेमान तसेच लावण्या विलास लोधे यासह अनेक विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळविले असून अनेक विद्यार्थ्यांनी ४९० पेक्षा अधिक मार्क मिळविले आहेत.
----
३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा
एमबीबीएससाठी प्रवेश
जरीवाला शाहीन ॲकॅडमीत विद्यार्थ्यांकडून सरावासहित योग्य मार्गदर्शन केले जाते. मेहफूज रहेमान जरीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विद्यार्थ्यांकडून कठीण परिश्रम घेऊन अभ्यास करून घेतला जातो. या ॲकॅडमीमध्ये उच्चशिक्षीत व त्या विषयांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विविध शहरांमधून येथे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. २०१८ मध्ये येथे चार विद्यार्थ्यांनी एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविला. दरवर्षी येथे एमबीबीएसचा आलेख वाढत आहे. आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एमबीबीएसमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे डॉक्टर घडविणारी ॲकॅडमी म्हणून जरीवाला शाहीन ॲकॅडमीकडे बघितले जाते. मोहम्मद इस्कहाक शेठ जरीवाला, मेहफुजरहेमान जरीवाला व जियाउर रहेमान जरीवाला यांचे मोलाचे योगदान आहे.