मस्ट
फोटो : 29152
नंदुरबार ः शस्त्रक्रियेनंतर मणक्याचा त्रास कमी झाल्याने आनंद व्यक्त करताना रुग्ण.
-----------------------------
जननायक बिरसा मुंडा महाविद्यालयात
अकरा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
नंदुरबार, ता. ९ : येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातर्फे ‘द स्पाईन फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ११ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांची वैद्यकीय पथकाकडून देखरेख करण्यात येत आहे.
डॉ. शेखर भोजराज, डॉ. शीतल मोहिते, डॉ. तुषार देवरे, डॉ. मंदार बोर्डे आणि डॉ. जयेश भानुशाली तव त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. जोतीकुमार बागूल यांनी संयोजन केले. अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. भारत कोवे, डॉ. महेश मुथा, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. योगेश बोरसे, डॉ. प्रसाद सुले, डॉ. गुलाबसिंग पावरा, डॉ. मीनाक्षी कलम, डॉ. मनोज पवार व सहकाऱ्यांनी मदत केली. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ओटी नर्सिंग टीमचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. नीलिमा वळवी, प्रभारी प्रियांका वळवी, स्टाफ नर्स प्रिया नाईक, साक्षी बाखळे, स्टाफ नर्स काजल शिंदे, एसबी सुमित गावित आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या व्यवस्थापनात मदत केली.
कोट-----
फोटो : 29118
नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील रुग्णांना मणक्याच्या विकारांसाठी तज्ज्ञांची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, हा या शिबिरामागील उद्देश होता. यामुळे गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळाले तसेच येथील वैद्यकीय पथकाला मुंबईतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यातही जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न राहील.
- डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, जननायक बिरसा मुंडा शासकीय महाविद्यालय