NSK26H29138
जळगाव : रोटरी क्लबच्या आनंदोत्सवात श्रीकांत इंदाणी, चंद्रशेखर सिकची, ॲड. हेमंत भंगाळे, स्वाती ढाके, गिरीश कुलकर्णी आदी.
--------
गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद हीच
डिस्ट्रिक्ट अवॉर्डच्या रुपाने पावती
----
माजी प्रांतपाल श्रीकांत इंदाणी : रोटरी क्लबचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : रोटरी क्लब जळगावने २०२५-२६मध्ये गरजूंच्या जीवनात निर्माण केलेला प्रकाश व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे क्लबला मिळालेले सर्वाधिक ४४ रोटरी डिस्ट्रिक्ट अवॉर्ड ही त्याची पावतीच आहे, असे मत माजी प्रांतपाल श्रीकांत इंदाणी यांनी व्यक्त केले.
येथील गणपतीनगरातील रोटरी भवनात झालेल्या क्लबच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, २०२५-२६चे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
श्री. इंदाणी पुढे म्हणाले की, प्रत्येक अध्यक्षाला रोटरीमध्ये ३६५ दिवसच मिळतात. मात्र, गिरीश कुलकर्णी यांनी नावीन्यपूर्ण संकल्पना त्यांची योग्य अंमलबजावणी करून सेवाकार्याचा प्रभाव निर्माण केला. त्यांना मानद सचिव सुभाष अमळनेरकर व संवाद सचिव पंकज व्यवहारे यांच्यासह सर्व सदस्यांचे सहकार्य पाठिंबा मिळाला. त्यामुळे रोटरी क्लब जळगावच्या शिरपेचात हा यशाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रेरणेतूनच प्रत्येकाच्या मनात सेवेची ज्योत प्रज्वलित राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
रोटरी डिस्ट्रिक्टकडून व्यक्तिगत पुरस्कार मिळालेल्या सदस्यांचा व अवॉर्ड विजेत्या कमिटीचे चेअरमन सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. तुषार फिरके यांनी सूत्रसंचालन केले.