पान-४ जिल्हा शहर--- दोन्ही टुडेमध्ये वापरणे
-------------------
NSK26H29164
सर्वतिर्थ टाकेद ः शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगतर्फे येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, त्याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक.
-----------
३६-२
‘शताब्दी इन्स्टिट्यूट’तर्फे
टाकेदला स्वच्छता मोहीम
-----------
मेकॅनिकल विद्यार्थी संघटनेचा पुढाकार
-----------
नाशिक, ता.९ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲड रिसर्चतर्फे सर्वतीर्थ टाकेद (ता.इगतपुरी) येथे स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिर झाले. या उपक्रमात संस्थेच्या सर्व अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने टाकेद येथील ऐतिहासिक मंदिर परिसर तसेच लगतच्या परिसराची स्वच्छता केली. या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक स्थळांच्या जतनाबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छता अभियानासोबतच रक्तदान शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी व कर्मचारींनी रक्तदान केले. या उपक्रमातून ‘रक्तदान हेच जीवनदान’ या सामाजिक संदेशाचा प्रसार करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव, पर्यावरणीय संवेदनशीलता, सामूहिक कार्यभावना व सामाजिक उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्याचा प्रत्यक्ष अनुभवही प्राप्त झाला. या उपक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रीतम वीर व डॉ. स्नेहा वीर यांनी मार्गदर्शन केले. कॅम्पस संचालक डॉ. सी. के. पाटील व प्राचार्य डॉ. संजय बागूल यांचे आभार मानले. उपक्रमासाठी विभागप्रमुख एस. डी. रत्नाकर, उपक्रम समन्वयक व्ही. बी. नरवडे, सहाय्यक कर्मचारी शैलेश सोनवणे, पियुष भामरे, प्रतीक्षा मोरे यांनी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला.