NSK26H29166
भुसावळ : नाहटा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत सहभागी मान्यवर.
भुसावळ येथे राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद
संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर नाहाटा महाविद्यालयात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ९ : येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे आयोजित एक दिवसीय बाराव्या राष्ट्रीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात ५२ संशोधक प्राध्यापक तसेच ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन संशोधकांनी केले. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्याहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय पाटे (चाळीसगाव), उपप्राचार्य प्रा. डॉ. गजेंद्र आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, परिषदेच्या संयोजक प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, प्रा. डॉ. स्वाती पी. फालक, आयोजक प्रा. डॉ. हर्षल व्ही. पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘एआय’ला न घाबरता त्याच्याशी जुळवून घेऊन त्याचा योग्य वापर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे ध्येय असले पाहिजे, असे डॉ. मोहन फालक यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात माहिती दिली. तीन सत्रात झालेल्या परिषदेच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. संजय पाटे यांचे बीजभाषण झाले. त्यांनी ‘संगणकशास्त्रातील संशोधन’`या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात संशोधकानी शोधनिबंधाचे ऑनलाईन व ऑफलाईन वाचन केले. प्रा. डॉ. वंदना चौधरी, प्रा. डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले. तिसऱ्या समारोपाच्या सत्रात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. गजेंद्र वाणी यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. सचिन जोशी यांनी परिषदेचे उत्कृष्टपणे आयोजन केल्याचा तसेच विद्यार्थिनी तेजल बारी हिने आजची परिषद ही विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त झाल्याचा अभिप्राय दिला. मान्यवरांच्याहस्ते सहभागी संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रा. गौरी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. वाणी, प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. डॉ. स्वाती फालक, प्रा. डॉ. हर्षल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
----------------------------