फोटो : 29170
नंदुरबार : हिरा प्रेरणा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. रवींद्र चौधरी, शिरीष चौधरी, अनिता चौधरी, महेश पाटील, प्रथमेश चौधरी, ॲड. गौरव चौधरी आदी.
------------------------
हिरा प्रेरणा महोत्सवात
३० संघांचा सहभाग
नंदुरबार, ता. १० : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही हिरा प्रतिष्ठानकडून प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळण्यासाठी पुढील वर्षापासून हिरा प्रेरणा महोत्सव जिल्हास्तरावर घेण्यात येईल. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, असे हिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी यांनी सांगितले.
हिरा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘हिरा प्रेरणा महोत्सव-२०२६’ अंतर्गत विद्यालयीन मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माजी आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्षा अनिता चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक ॲड. गौरव चौधरी, सहसचिव महेंद्र फटकाळ, क्रीडाशिक्षक बळवंत निकुंभ, जयदीप नटावदकर, पोलिस उपनिरीक्षक सलीम तडवी, कनिष्ठ अभियंता सचिन पवार, राष्ट्रीय खेळाडू कपिल बोरसे व पंचप्रमुख जे. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. महेश पाटील व तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत एकूण ३० संघ सहभागी झाले आहेत.
मुख्याध्यापक युवराज भामरे, अनिल चौधरी, क्रीडा शिक्षक शोभराज खोंडे, योगेश निकुंभ, आकाश बागूल, योगेश कुंभार, साद पठाण, शरीफ शेख, समर्थ रघुवंशी, पल्लवी बारी आदी उपस्थित होते. चेतना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश काटके यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी सुरेंद्र पाटील, अमोल भदाणे, विशाल चौधरी व रवींद्र चौधरी आदींनी प्रयत्न केले.