मेन
--
लोगो : सकाळ विशेष
लोगो : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष
----
दररोज संपतेय दोघांचे अनमोल आयुष्य
आठ महिन्यात ४४२ जणांनी कापली आयुष्याची दोरी
नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : शहरात गेल्या आठ महिन्यात ४४२ जणांनी विषप्राशन वा गळफास घेत आपल्या अनमोल आयुष्याची दोरी स्वत:च कापली आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्यात १० टक्के प्रमाण हे अल्पवयीन मुला- मुलींचे तर, ८० टक्के प्रमाण हे २० ते ५० या वयोगटातील आहे. तरुण आत्महत्येच्या मार्गावर जाण्यामागे त्यांच्यासमोरील ताणतणावाची स्थिती भीषण नसली तरी चिंताजनक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने २०२६ या वर्षासाठी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘चेजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. जीवनाचा आनंद घेत असतानाच, काहींनी मात्र निसर्गाच्या विरोधात जाऊन स्वतःहून आपली जीवनयात्रा संपविली. गत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या २४४ दिवसांमध्ये ४४२ जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. बहुतांश आत्महत्या या मानसिक व कौटुंबिक ताणतणावातून आहेत. त्यामागील कारणे आर्थिक विवंचना, घरगुती कलह जशी आहेत, तशीच तरुणांमध्ये प्रेमभंगाचीही कारणे समोर आली आहेत. अलीकडे तर, अल्पवयीन मुले-मुलीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. हे प्रमाण अलीकडे दिवसेंदिवस वाढते आहे. तर २० ते ४० वयोगटातील युवा वर्गातील आत्महत्येचे प्रमाण दुप्पटी-तिप्पटीने वाढते आहे. यामागील कारणे मात्र मानसोपचार तज्ज्ञांच्या मते संशोधनाचाच विषय आहे. गत २०२५ या वर्षी ५२३ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यात ३०३ जणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे.
---कोट
फोटो : H29174
घरात, मित्रांमध्ये, नात्यांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे. संवादातून अशा नैराश्यातून वा आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडता येऊ शकते. जीवन अनमोल असून, प्रत्येक क्षण एकसारखा नसतो यावर जरी विश्वास ठेवला तरी आयुष्य सुंदररीत्या जगता येऊ शकते.
- डॉ. स्वाती चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.
---.
आठ महिन्यातील आकडेवारी (२०२६)
महिना... विषप्राशन.... गळफास.... पाण्यात बुडून ..... एकूण
जानेवारी ..... १३..... २७ .... ५ ... ४५
फेब्रुवारी .... १६ .... १७ ....६ .... ३९
मार्च .... २० .... ३८ .... ११ ... ६९
एप्रिल .... १५ .... ३७ ... ७ .... ५९
मे .... ९ ..... ३० ... १६ .... ५५
जून .... १३ .... ३४ ... १६ ...६३
जुलै .... १५ .... ३९ ... ५ .... ५९
ऑगस्ट ..... १२ .... ३५ ..... ६ .... ५३
एकूण .... ११३.... २५७ ... ७२ .... ४४२
(जिल्हा रुग्णालयातील नोंदीनुसार)
--चौकट
मार्च महिन्यात सर्वाधिक
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात आत्महत्या करण्यात आलेल्यांची संख्या ४४२ आहे. मात्र, यात गेल्या मार्च महिन्यात ६९ जणांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या सर्वाधिक आहे. तर, जुलै महिन्यात ६० जणांनी आत्महत्या केली असून ही सर्वात कमी संख्येची नोंद आहे.