टुडे चार : मेन फिचर
NSK26H29181
जळगाव : गणेश विर्सजनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आयोजित रंगीत तालीममध्ये मेहरुण तलावातील बुडणाऱ्या व्यक्तिला वाचविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
........
मेहरुण तलावावर ‘अग्निशमन’ची रंगीत तालीम
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सराव; रबर बोटीतून प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध घाट सज्ज होत असताना भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनानेही तयारीला वेग दिला आहे. मेहरूण तलाव येथील गणेश घाटावर विसर्जनादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जवानांनी जलद बचावकार्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
महापालिका आयुक्तांच्या विशेष सूचनेनुसार झालेल्या या सरावाचे नेतृत्व मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह वाहनचालक व फायरमन सहभागी झाले होते. तलावातील पाण्यात व्यक्ती बुडण्याची अथवा संकटात सापडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत कशी पोहोचवायची, याचा सराव यावेळी करण्यात आला.
यांचा होता सहभाग
अग्निशमन दलातील देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, निवांत इंगळे, अजय पाटील, प्रदीप धनगर, तेजस जोशी, गिरीश खडके, ऋषभ सुरवाडे, केतन पाटील, विकी सोनवणे, नितीन ससाने व रजनीश भावसार यांनी सहभाग घेतला. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफडे यांच्यासह जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, रामलाल बोरसे, दिनेश सपकाळे, गोकुळ पाटील व राजू गुप्ता उपस्थित होते.
चौकट
सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज
ओबीएम रबर बोटीच्या साहाय्याने जवानांनी तलावात उतरून बोटीचे नियंत्रण, संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि जीवरक्षक साधनांचा योग्य वापर याचे प्रात्यक्षिक केले. विसर्जन काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.