आत्महत्या प्रतिबंध दिवस.

आत्महत्या प्रतिबंध दिवस.
Published on
टुडे एक मेन फिचर (एआय चित्र वापरावे) लोगो : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस ------ जिल्ह्यातील ५८० जणांना आत्महत्येपासून केले परावृत्त जिल्हा मानसिक आरोग्य पथकाकडून समुपदेशन; दहा व्यक्तींमागे तीन लोक मानसिक तणावात देवीदास वाणी : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : नापिकी, कर्जबाजारीपणा, कुटुंबातील हरवत चाललेला संवाद, उदासीनता, नैराश्य आणि मोबाईलचा अतिरेक आदी कारणांमुळे आत्महत्येचे विचार व व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना, कुठलीही समस्या, संकट किंवा दुःखावर आत्महत्या हा उपाय नाही, असा संदेश देत शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम पथकाने समुपदेशनातून गेल्या आठ महिन्यांत ५८० जणांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. जळगावमध्ये दररोज सरासरी २ ते ३ आत्महत्यांची नोंद होते. कौटुंबिक तणाव, व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा आणि लग्न न जमण्यासारखी कारणे प्रामुख्याने समोर येतात. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते, तेव्हा केवळ एक जीव जात नाही; एक कुटुंब उद्ध्वस्त होते. अनेक नाती कायमची बदलतात आणि अनेक अनुत्तरित प्रश्न मागे राहतात. आत्महत्या ही केवळ एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक घटना नसून ती मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद, सामाजिक आधारव्यवस्थेच्या स्थितीचा आरसा आहे. ---- ही आहेत कारणे * कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा खूप वाढल्या. * समाधान बऱ्याचदा मानत नाहीत. * प्रत्येक जण नैराश्‍याच्या गर्तेत वावरतो. * साध्या साध्या कारणावरून आत्महत्या होताहेत. * दारूचे व्यसन, नैराश्य, कौटुंबिक कलह * कर्जबाजारी, मानसिक ताण, लग्न न होणे, प्रमुख कारणे. --- या आहेत उपाययोजना... * कुटुंबातील एकमेकांशी संवाद वाढवावा. * आवडीचे छंद जोपासणे. * प्रत्येक गोष्टीत समाधान मानणे. * आवडीच्या ठिकाणच्या गोष्टी आत्मसात करणे. * वाचन करणे फिरायला जाणे. ------- आत्महत्या थांबविण्यात आलेले यश.. तज्ज्ञांच्या मदतीने समुपदेशन, तज्ज्ञ समुपदेशकांचा रुग्णांसोबत संवाद यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, मानसिक आरोग्य कार्यक्रमाधिकारी मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध साळुकें यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात मानसिक आरोग्य सकारात्मक कार्यशाळा राबविल्या जातात. आत्महत्याग्रस्त कुटुंब व गाव पातळीवरती समुपदेश सत्रे घेतली जातात. जळगाव जिल्ह्यातून टेलिमानस १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर या वर्षात झालेल्या कॉलद्वारे ५ हजार ६५८ जणांचे समुपदेशन करण्यात आले. ------ कोट..NSK26H29191 परीक्षेतील अपयश, पालकांच्या अपेक्षा, करिअरची चिंता, सोशल मीडियावरील तुलना, प्रेमसंबंध आणि एकटेपणा यामुळे तरुणांमध्ये मानसिक ताण वाढू शकतो. म्हणूनच मुलांच्या गुणांपेक्षा त्यांची मानसिक अवस्था जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. मानसिक त्रास झाल्यास टेलीमानस १४४१६ टोल फ्री क्रमांकावर लगेच संपर्क साधा. - दौलत निमसे- पाटील, मानसशास्त्रज्ञ जिल्हा रुग्णालय, जळगाव ------------ ग्राफिक्स आकडे बोलतात... सहा महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या आत्महत्या....४३१ पुरुष.........३८३ महिला.........२९ मुले--..........८ मुली...........११ --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com